Pilot Monika Khanna: पटना विमानतळावर उड्डाण घेताच स्पाइस विमाना (SG-723) च्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली होती. परंतु पायलटच्या समजदारीमुळे 185 प्रवाशांचा जीव वाचवला आहे. या प्रवाशांचा जीव वाचवल्यामुळे दोन महिला पायलट मोठ्या चर्चेत आल्या आहेत. स्पाईसजेट फ्लाइटचे पटना विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केवळ महिला पायलट कॅप्टन मोनिका खन्ना आणि सहवैमानिक बजित सिंग भाटिया यांच्यामुळेच शक्य झाले.
दोन्ही महिला वैमानिकांनी अत्यंत संयम पाळत विमान धावपट्टीवर उतरवण्यात यश मिळवले. या घटनेनंतर दोन्ही महिला पायलट हिरोच्या रुपात समोर आल्या असून एअरलाइनच्या संचालकांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर कॅप्टन मोनिका खन्ना आपल्या शौर्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
185 प्रवाशांसह दिल्लीला जाणार्या विमानाचे रविवारी पाटना विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. कारण पटना येथून उड्डाण घेतल्यानंतर फ्लाइटच्या एका इंजिनला आग लागली होती. पायलट-इन-कमांड कॅप्टन मोनिका खन्ना यांनी आग लागलेल्या इंजिनला बंद करत आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवले. वास्तविक, पक्षी धडकल्यानंतर फ्लाइटच्या एका इंजिनला आग लागली होती.
काही रिपोर्ट्सनुसार, मोनिका खन्ना स्पाइस जेट कंपनीत उच्च पात्र पायलट आहेत. मोनिका खन्नाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून असे सूचित होते की तिला प्रवास करायला आवडते आणि नवीनतम फॅशन आणि ट्रेंडमध्ये तिला खूप रस आहे. कॅप्टन मोनिका खन्ना यांच्या तत्पर आणि अचूक प्रसंगावधनामुळे मोठी दुर्घटना टळली आणि अनेकांचे प्राण वाचले.
स्पाईसजेटचे फ्लाइट ऑपरेशन्सचे प्रमुख गुरचरण अरोरा म्हणाले की, कॅप्टन मोनिका खन्ना आणि पहिले पायलट बलप्रीत सिंग भाटिया यांनी या काळात स्वतःवर चांगले नियंत्रण ठेवले. त्या पूर्ण शांत राहिल्या आणि उड्डाण चांगले नियंत्रित केले. हे दोघेही अनुभवी अधिकारी असून त्यांनी आपले कर्तव्य अतिशय चोख बजावले आहे. त्या घाबरून न जाता सुरक्षितपणे फ्लाइट टेक ऑफ केली. त्यांचा आम्हाला अभिमान आहे.