SpiceJet चं बोईंग B737 विमान लँडिंगदरम्यान वादळात सापडलं, 40 जखमी, तर 12 जण गंभीर

स्पाईसजेटच्या (spicejet) विमानाला रविवारी मुंबई-दुर्गापूर (Mumbai-Durgapur flight) विमानतळावर (Airport) लँडिंग (Landing) करताना मोठ्या वादळाचा सामना करावा लागला.

SpiceJet's Boeing B737 found in storm during landing
SpiceJet चं बोईंग B737 विमान लँडिंगदरम्यान वादळात सापडलं,  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील काझी नजरुल इस्लाम विमानतळावर विमानाला अपघात.
  • लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात किमान ४० प्रवासी जखमी त्यातील १२ गंभीर जखमी झाले असले तरी ते धोक्याच्या बाहेर आहेत.
  • कॅबिनमधील सामान पडून प्रवाशी जखमी झाले.

नवी दिल्ली  : स्पाईसजेटच्या (spicejet) विमानाला रविवारी मुंबई-दुर्गापूर (Mumbai-Durgapur flight) विमानतळावर (Airport) लँडिंग (Landing) करताना मोठ्या वादळाचा सामना करावा लागला. लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात किमान ४० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही जण गंभीर जखमी आहेत. पश्चिम बंगालमधील (West Bengal) दुर्गापूर येथील काझी नजरुल इस्लाम विमानतळावर स्पाइसजेटचे विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले असून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "१ मे रोजी, स्पाईसजेटचे बोईंग B७३७ विमान मुंबई ते दुर्गापूर विमान पश्चिम बंगालच्या दुर्गापूर जिल्ह्यातील काझी नझरुल इस्लाम या विमानतळावर उतरत असताना ही दुर्घटना घडली. खराब वातावरणामुळे आणि वादळामुळे लँडिंगदरम्यान विमानातील अनेक प्रवासी जखमी झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमान दुर्गापूर इथे उतरल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं. "स्पाईसजेटला या दुर्दैवी घटनेबद्दल खेद वाटतो आणि जखमींना सर्व शक्य वैद्यकीय मदत पुरवत आहोत," असं ते म्हणाले.या घटनेदरम्यान अनेक प्रवासी चांगलेच घाबरले असल्याचं सांगण्यात येत आहे. लँडिंग करत असताना विमानाच्या केबिनमधील सामान प्रवाशांच्या अंगावर पडले, त्यामुळे अनेकांना डोक्याला जखमा झाल्या. मात्र, वैमानिकांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांनी भरलेलं हे विमान व्यवस्थितपणे वादळातून बाहेर काढण्यात आलं आहे. 

Read Also : पगारवाढीसाठी येणार नवीन योजना! या आधारे वाढणार वेतन

या घटनेत विमानातील ४० प्रवाशांपैकी किमान १२ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास करण्यात येत आहे, दरम्यान १२ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असली तरी ते धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी