VIDEO: श्रीलंका पुन्हा एकदा हादरलं, चर्चजवळील व्हॅनमध्ये शक्तीशाली बॉम्बचा स्फोट

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 22, 2019 | 19:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sri Lanka Bomb explodes: काल झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातून श्रीलंका सावरत नाही तोच आज पुन्हा एक बॉम्बस्फोट कोलंबोत झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण श्रीलंकेत भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

Sri lanka blast_Ani
श्रीलंका पुन्हा एकदा हादरलं, चर्चजवळील व्हॅनमध्ये शक्तीशाली बॉम्बचा स्फोट  |  फोटो सौजन्य: ANI

कोलंबो: श्रीलंकेत बॉम्बस्फोटाचं सत्र थांबण्याचं चित्र अद्यापही दिसत नाही. कारण अवघ्या काही मिनिटांपूर्वी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील एका चर्चजवळ पुन्हा एक मोठा बॉम्बस्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोलंबोतील एका चर्चमध्ये एका व्हॅनमध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. जेव्हा बॉम्बनाशक पथक हा बॉम्ब निकामी करण्याचं काम करत होते त्यावेळेसच या बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात काही जीवितहानी झालेली आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

दरम्यान, आता या स्फोटाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हॅनमधील बॉम्ब निकामी करताना त्याचा स्फोट झाला आहे. त्याच हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे.

 

 

दरम्यान, काल श्रीलंकेत ८ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाल्याने संपूर्ण श्रीलंकेत भीतीचं वातावरण पसरलं आहे. आतापर्यंत झालेल्या स्फोटामध्ये २९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन श्रीलंकन सरकारने आज मध्यरात्रीपासून आणबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच रात्री आठ वाजल्यापासून पहाटे सहापर्यंत कर्फ्यू देखील असणार आहे. 

श्रीलंकेत काल तब्बल ८ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटामध्ये २९० जणांचा हकनाक बळी गेला आहे. तसेच ५०० हून अधिक जण या साखळी बॉम्बस्फोटात जखमी झाले आहेत. दरम्यान, अद्यापही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे श्रीलंकन पोलिसांनी संशियत आरोपींची धरपकड सुरू केली असून आतापर्यंत २४ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, असं असलं तरीही बॉम्बस्फोटाचं सत्र अद्यापही सुरू आहे. आज (सोमवार) सकाळी देखील कोलंबोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक बॉम्ब आढळला होता. सुदैवाने आधीच बॉम्बनाशक पथकाने तो बॉम्ब निकामी केल्याने मोठी हानी टळली. मात्र, त्याच्या काही वेळानंतरच चर्चजवळ झालेल्या स्फोटाने पुन्हा एकदा कोलंबो शहर हादरून गेलं.  

श्रीलंकेमध्ये झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत भारताचेही ६ नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. या सहा जणांपैकी आतापर्यंत २ जणांची ओळख पटली आहे. याशिवाय या बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत गेलेल काही भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचं समजतं आहे. सध्या श्रीलंकेतील एकूण परिस्थितीवर भारत सरकार देखील लक्ष ठेऊन आहे. तसेच सर्व भारतीयांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न देखील सुरू करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: श्रीलंका पुन्हा एकदा हादरलं, चर्चजवळील व्हॅनमध्ये शक्तीशाली बॉम्बचा स्फोट Description: Sri Lanka Bomb explodes: काल झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातून श्रीलंका सावरत नाही तोच आज पुन्हा एक बॉम्बस्फोट कोलंबोत झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण श्रीलंकेत भीतीचं वातावरण पसरलं आहे. 
Loading...
Loading...
Loading...