श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटात १६० जणांचा मृत्यू, ४०२ जण जखमी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 21, 2019 | 16:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sri lanka bomb blast: श्रीलंकेची राजधानी कोलंबो आज साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. ३ चर्च आणि ३ पंचतारांकित हॉटेलमध्ये हे बॉम्बस्फोट घडविण्यात आले आहेत.

BlastinLnaka_twitter
श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, १६० जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Twitter

कोलंबो: (Blast in Sri Lanka) श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टर संडेच्या निमित्त चर्चमध्ये सुरू असलेल्या प्रार्थनेवेळी अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं प्राथमिक वृत्त समोर येत आहे. श्रीलंकेत तब्बल सहा साखळी बॉम्बस्फोट झाले असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये १६० जणांचा मृत्यू झाला असून ४०२ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. पहिला स्फोट हा कोलंबोच्या कोछीकडे येथील सेंट एन्थनी चर्चमध्ये झाला तर दुसरा स्फोट हा कटाना येथील एका दुसऱ्या चर्चमध्ये झाला. याशिवाय शांगरी-ला हॉटेल आणि किंग्सबरी हॉटेल येथील बॉम्बस्फोट झालं असल्याचं समजतं आहे. या बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आतापर्यंत ६ ठिकाणी स्फोट झाले असल्याचं समजतं आहे. 

दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ज्यावेळी लोक ईस्टर संडेच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये एकत्र आले होते. त्याचवेळी हा स्फोट घडवण्यात आले. श्रीलंकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला बॉम्बस्फोट हा स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:४५ वा. झाला. तीन स्फोट हे चर्चमध्ये झाले असून ३ स्फोट हे पंचतारांकित हॉटेलात झाले आहेत. 

कुठे-कुठे झाले बॉम्बस्फोट

  1. कोछिकडे चर्च
  2. काटुवापिटिया चर्च 
  3. बॅटलिकलोआ चर्च 
  4. शांगरी-ला हॉटेल
  5. किंग्सबरी हॉटेल 
  6. सिनेमन ग्रॅण्ड हॉटेल 

या साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन लष्कराला कोलंबोमध्ये पाचारण करण्यात आलं आहे. याशिवाय कोलंबोतील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. 

या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन याबाबत अशी माहिती दिली आहे की, 'मी कोलंबोतील भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात आहे. आम्ही तेथील परिस्थितीवर सतत नजर ठेऊन आहोत.'

दरम्यान, या साखळी बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना कोलंबोच्या नॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा बॉम्बस्फोटांमागे इस्लामिक दहशतवादी संघटनांचा हात असू शकतो. दरम्यान, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटात १६० जणांचा मृत्यू, ४०२ जण जखमी Description: Sri lanka bomb blast: श्रीलंकेची राजधानी कोलंबो आज साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. ३ चर्च आणि ३ पंचतारांकित हॉटेलमध्ये हे बॉम्बस्फोट घडविण्यात आले आहेत.
Loading...
Loading...
Loading...