श्रीलंका: बॉम्बस्फोटात १६० जणांचा मृत्यू, भारताकडून हेल्पलाइन सुरू

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 21, 2019 | 19:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sri Lanka bomb blast: श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर आता मृतांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे आता भारताकडून तेथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे. 

Srilanka blast
श्रीलंका: बॉम्बस्फोटात १३८ जणांचा मृत्यू, भारताकडून हेल्पलाइन सुरू  |  फोटो सौजन्य: Twitter

कोलंबो: श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज (रविवारी) सकाळी ८.४५ वा. तब्बल सहा साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. यामध्ये आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हे बॉम्बस्फोट ईस्टर संडेच्या दिवशीच चर्च आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घडवून आणण्यात आले आहेत. या बॉम्बस्फोटांमुळे भारतात देखील काहीसं चिंतेचं वातावरण आहे. कारण श्रीलंकेमध्ये अनेक भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाचे लोक राहतात. याशिवाय अनेक भारतीय पर्यटक देखील श्रीलंकेत जातात. सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही भारतीय नागरिकाबाबत या स्फोटाशी निगडीत माहिती समोर आलेली नाही. पण तरीही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या कोलंबोतील भारतीय दूतावासाशी सतत संपर्कात आहेत. तसेच तेथील परिस्थितीवर त्या नजर ठेऊन आहेत. याबाबत त्यांनी ट्वीट देखील केलं आहे. 

याशिवाय भारत सरकारने भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर देखील सुरू केले आहेत. दूतावासाने याबाबत ट्वीट देखील केलं आहे. 'कोलंबो आणि बट्टीकालोआ येथे बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. आम्ही येथील परिस्थितीवर नजर ठेऊन आहोत. मदत किंवा कोणत्याही माहितीसाठी भारतीय नागरिक या क्रमांकावर संपर्क करू शकतात.: +94777903082 +94112422788 +94112422789 . श्रीलंकेतील या क्रमांकाशिवाय भारतातील देखील काही क्रमांक देण्यात आले आहेत.: +94777902082 +94772234176 

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटात १२९ जणांचा मृत्यू, ३५० जण जखमी

 

 

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला असून आणखीही मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे संपूर्ण कोलंबोमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं असून आता श्रीलंकन लष्कराला देखील कोलंबोमध्ये बोलावण्यात आलं आहे. याशिवाय श्रीलंकन सरकारने एक आपतकालीन बैठक देखील बोलावली आहे. तसेच कोलंबोमधील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
श्रीलंका: बॉम्बस्फोटात १६० जणांचा मृत्यू, भारताकडून हेल्पलाइन सुरू Description: Sri Lanka bomb blast: श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर आता मृतांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे आता भारताकडून तेथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे. 
Loading...
Loading...
Loading...