Sri Lanka Updates | लंकेला लागली आग! लंकेत परिस्थिती हाताबाहेर...राष्ट्राध्यक्षांच्या घराजवळची निदर्शने झाली हिंसक

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत परिस्थितीने अत्यंत गंभीर रुप धारण केले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने करणारे शेकडो लोक गुरुवारी हिंसक झाले. निदर्शनांनी हिंसक वळण घेतल्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळची परिस्थिती गंभीर झाली होती. या हिंसेत किमान एक जण गंभीर जखमी झाला. श्रीलंकन नागरिकांनी देशाच्या रसातळाला गेलेल्या आर्थिक परिस्थितीशीसंदर्भातील सरकारच्या हाताळणीवर टीका केली.

Protests Near Sri Lanka President's Home
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाजवळची निदर्शने झाली हिंसक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत गंभीर
  • श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाजवळच्या निदर्शनांनी धारण केले हिंसक रुप
  • श्रीलंकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली असून अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर

Sri Lanka Protests updates : कोलंबो : श्रीलंकेत परिस्थितीने (Sri Lanka Crisis) अत्यंत गंभीर रुप धारण केले आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Sri Lankan President Gotabaya Rajapaksa) यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने करणारे शेकडो लोक गुरुवारी हिंसक झाले. निदर्शनांनी (Protests Near Sri Lanka President's Home)हिंसक वळण घेतल्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळची परिस्थिती गंभीर झाली होती. या हिंसेत किमान एक जण गंभीर जखमी झाला. श्रीलंकन नागरिकांनी देशाच्या रसातळाला गेलेल्या आर्थिक परिस्थितीशीसंदर्भातील सरकारच्या हाताळणीवर टीका केली. (Sri Lanka Crisis worsens as protests near Sri Lanka President's residence turned violent)

अधिक वाचा : Crude Oil from Russia | भारताने रशियाकडून सातत्याने कच्च्या तेल खरेदी केल्यामुळे अमेरिका भडकली, भारताला इशारा

राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान बनले रणभूमी

राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी जमावावर गोळीबार केला. त्याचबरोबर निदर्शकांवर अश्रूधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर करण्यात आला. आंदोलकांनी कोलंबोच्या मिरिहाना निवासी क्वार्टरमध्ये राजपक्षे यांच्या घराकडे जाणाऱ्या लेनमध्ये उभ्या असलेल्या लष्कराच्या बसला तसेच पोलिसांच्या वाहनाला आग लावली. हिंसेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे घरी नव्हते, अशी बातमी एका वृत्तसंस्थेने दिली.

अधिक वाचा : आर्थिक संकटातल्या श्रीलंकेत रस्त्यांवरचे दिवे बंद करून वीज वाचविण्याचे आदेश

श्रीलंकेतील ऐतिहासिक संकट

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २२ लाख लोकसंख्येचे हे दक्षिण आशियाई राष्ट्र स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट मंदीच्या संकटाला तोंड देते आहे. अगदी अत्यावश्यक आयातींसाठी आवश्यक असलेल्या परकीय चलनाच्या तीव्र अभावामुळे श्रीलंकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली असून अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर आहे.

अधिक वाचा : Russia- Ukraine War : थेट पुतीनशी बोलून नरेंद्र मोदी संपवू शकतात युद्ध; मध्यस्थीसाठी युक्रेनकडून आवाहन

राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळची निदर्शने ही दहशतवादी कृत्ये

श्रीलंकेच्या सरकारने सध्याच्या आर्थिक संकटांवर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या हिंसक निदर्शनास "दहशतवादाचे कृत्य" म्हणून संबोधले आहे. श्रीलंकन सरकारने या घटनेसाठी विरोधी पक्षांशी संबंधित "अतिरेकी घटका" ला दोष दिला आहे. गुरुवारी राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक निदर्शने सुरू झाली कारण शेकडो निदर्शक तेथे जमले आणि त्यांनी श्रीलंकेतील या सर्वात वाईट आर्थिक संकटाला सामोरे जाण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

1948 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाला श्रीलंका तोंड देते आहे. बिघडलेल्या आर्थिक स्थितीमुळे श्रीलंकेमध्ये संताप उसळतो आहे. संतापाचा बराचसा रोख हा या हिंद महासागरातील देशाच्या सर्वशक्तिमान राजपक्षे कुटुंबावर आहे. श्रीलंकन नागरिक राजपक्षे कुटुंब आणि श्रीलंकन सरकारवर प्रचंड संतापलेले आहेत. श्रीलंकन सरकार जर आर्थिक संकटाला हाताळू शकले नाही किंवा नजीकच्या काळात यावर काही उपाययोजना करू शकले नाही तर श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर जात अतिशय रौद्र रुप धारण करण्याची चिन्हे आहेत. श्रीलंकेला सध्या आपल्या दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंची पूर्तता करणेदेखील जड जाते आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड हवालदिल झाले असून त्यांचा संताप दिसून येतो आहे. या ऐतिहासिक संकटातून श्रीलंकन सरकार आपल्या देशाला कसे तारते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी