श्रीलंकेत आणबाणी; नागरिक रस्त्यावर, PM निवासावर कडेकोट बंदोबस्त

Sri Lanka Declares Emergency After Prez Rajapaksa Flees to Maldives Tear Gas Shells Fired as Protestors Scale Wall to Enter PM Ranil Wickremesinghe Home : कोलंबो: राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांनी श्रीलंकेतून पलायन करून मालदीवमध्ये आश्रय घेतला. यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली.

Sri Lanka Declares Emergency After Prez Rajapaksa Flees to Maldives Tear Gas Shells Fired as Protestors Scale Wall to Enter PM Ranil Wickremesinghe Home
श्रीलंकेत आणबाणी; नागरिक रस्त्यावर, PM निवासावर कडेकोट बंदोबस्त  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • श्रीलंकेत आणबाणी; नागरिक रस्त्यावर, PM निवासावर कडेकोट बंदोबस्त
  • हिंसेला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई
  • आकाशातून टेहळणी

Sri Lanka Declares Emergency After Prez Rajapaksa Flees to Maldives Tear Gas Shells Fired as Protestors Scale Wall to Enter PM Ranil Wickremesinghe Home : कोलंबो: राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांनी श्रीलंकेतून पलायन करून मालदीवमध्ये आश्रय घेतला. यानंतर रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी हंगामी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या सरकारी निवासस्थानाकडे कूच करण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी हंगामी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या सरकारी निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तात्पुरती सोय म्हणून हंगामी पंतप्रधानांकडेच हंगामी राष्ट्रपतीपद देण्यात आले आहे. । श्रीलंका

हिंसेला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई

नागरिकांना थोपविण्यासाठी रस्त्यांवर सुरक्षा रक्षकांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. काही ठिकाणी मर्यादीत प्रमाणात पोलीस बळाचा वापर करून जमावाला मागे रेटण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक आणि नागरिकांचा जमाव असा संघर्ष सुरू आहे. 

आकाशातून टेहळणी

जमावाच्या हालचालींवर आकाशातून हवाईदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे लक्ष ठेवले जात आहे. श्रीलंकेची संसद ते हंगामी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे सरकारी निवासस्थान या परिसरात हेलिकॉप्टर आकाशातून सतत घिरट्या घालून हवाई टेहळणीचे काम करत आहे.

श्रीलंकेच्या संसदेचे विशेष अधिवेशन

श्रीलंकेच्या संसदेचे विशेष अधिवेशन शुक्रवार १५ जुलै २०२२ रोजी होणार आहे. या अधिवेशनात आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी काय करावे यावर चर्चा होईल. तसेच मंगळवार १९ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती पदासाठी इच्छुक उमेदवार अर्ज सादर करतील. बुधवार २० जुलै २०२२ रोजी नव्या राष्ट्रपतींची निवड केली जाईल. नवे राष्ट्रपती देशाची सूत्रं हाती घेतील. यानंतर श्रीलंकेत एक सर्वपक्षीय सरकार स्थापन केले जाईल. या सरकारला राष्ट्रपती शपथ देतील. नव्या सरकारची जबाबदारी श्रीलंकेला आर्थिक संकटातून सावरणे ही असेल. श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने (Mahinda Yapa Abeywardena) यांनी ही माहिती दिली.

श्रीलंकेतील आर्थिक संकट

जेमतेम दोन कोटी सोळा लाख लोकसंख्या असलेली श्रीलंका आर्थिक संकटात सापडली आहे. आयात करण्यासाठी श्रीलंकेकडे पुरेसे विदेशी चलन नाही. चिनी प्रकल्प आणि सरकारचे अवास्तव सवलती आणि करमाफी देण्याचे धोरण यामुळे श्रीलंका सरकारकडे देश चालविण्यासाठी पुरेसा पैसा उरलेला नाही. अमेरिकेच्या एका डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचे ३६० रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात श्रीलंकेच्या चलनाचे अवमूल्यन झाले आहे. आर्थिक संकटाने त्रस्त नागरिकांनी या सर्व परिस्थितीसाठी दोषी ठरवत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांच्या सरकारी निवासस्थानावर शनिवार ९ जुलै २०२२ रोजी हल्ला केला. असंख्य संतप्त नागरिक राष्ट्रपती निवासस्थानाच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांनी पलायन केले. ते राष्ट्रपती निवासस्थान सोडून एका अज्ञात आणि सुरक्षित ठिकाणाकडे रवाना झाले. परिस्थिती थोडी सावरल्याचे पाहून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा कोलंबो विमानळावर आले आणि तिथून विमानातून मालदीवला निघून गेले. यानंतर नागरिक शांत होतील असे वाटत होते. पण तसे झाले नाही. राष्ट्रपती देशाबाहेर निघून गेल्याचे कळताच नागरिकांनी हंगामी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या सरकारी निवासस्थानाकडे कूच केले. नागरिकांच्या हालचालींचा अंदाज येताच हंगामी पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारी निवासस्थानाला संरक्षण देण्यासाठी सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा सज्ज झाला आहे. श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी