श्रीलंकेने केला पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा अपमान, हे आहे कारण

श्रीलंकेने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा अपमान केला आहे. पुढील आठवड्यात श्रीलंकेच्या संसदेत बोलण्याची तयारी इमरान खान करत होते, मात्र हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे.

Imran Khan
श्रीलंकेने केला इमरान खान यांचा अपमान, संसदेत बोलण्याचे निमंत्रण देऊन कार्यक्रम केला रद्द 

थोडं पण कामाचं

  • येत्या 24 फेब्रुवारी रोजी संसदेला संबोधित करणार होते इमरान खान
  • इमरान खान काश्मीरबद्दल बोलण्याच्या शक्यतेमुळे निर्णय
  • प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरबद्दल बोलत आहे पाकिस्तान

श्रीलंकेने (Sri Lanka) पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan PM) इमरान खान (Imran Khan) यांचा अपमान (insult) केला आहे. पुढील आठवड्यात श्रीलंकेच्या संसदेत (parliament) बोलण्याची तयारी इमरान खान करत होते, मात्र हा कार्यक्रम अचानक रद्द (cancel) करण्यात आला आहे. या व्यासपीठाचा वापर करून इमरान खान काश्मीरबद्दल (Kashmir) बोलतील हे यामागचे कारण असल्याचे म्हटले जात आहे, पण अधिकाऱ्यांनी मात्र कोरोनाविषयीच्या निर्बंधांमुळे (corona protocols) हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. मात्र कोलंबोतील संबंधितांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले आहे की जर इमरान खान यांनी काश्मीरचा मुद्दा उचलला तर याचे काय परिणाम होतील यावर सरकार पुनर्विचार करत आहे.

येत्या 24 फेब्रुवारी रोजी संसदेला संबोधित करणार होते इमरान खान

श्रीलंकेचे स्पीकर महिंद्रा अबेवर्देना यांनी गेल्या आठवड्यात सर्व राजकीय पक्षांना सांगितले होते की इमरान खान 22 फेब्रुवारीपासून चालू होणाऱ्या दोन दिवसीय श्रीलंका दौऱ्यादरम्यान संसदेला संबोधित करतील. इमरान खान 24 फेब्रुवारीला संसदेत भाषण करणार होते. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे आणि परराष्ट्र मंत्री दिनेश गुनावर्देना यांचीही भेट घेणार आहेत.

इमरान खान काश्मीरबद्दल बोलण्याच्या शक्यतेमुळे निर्णय

उपरोल्लेखित व्यक्तीने सांगितले, ''संसदेला संबोधित करण्याबाबत याआधी व्यवस्थित विचार केला गेला नसल्याचे दिसत आहे. इमरान खान यांच्याकडून काश्मीरचा मुद्दा लावून धरला जाण्याच्या शक्यतेबद्दल सरकारमध्ये बरीच चर्चा झाली आहे. याच्या संभाव्य दुष्परिणामांचा विचार करून त्यांचे भाषण रद्द करण्यातच शहाणपणा असल्याचे सरकारने ठरवले आहे.''

प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरबद्दल बोलत आहे पाकिस्तान

पाकिस्तानी सरकार सध्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर काश्मीरचा मुद्दा लावून धरत आहे. ऑगस्ट 2019मध्ये काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर तर याचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तानने गेल्या वर्षी भारताकडून आयोजित करण्यात आलेल्या कोरोनासंबंधीच्या सार्क देशांच्या ऑनलाईन बैठकीतही हाच मुद्दा उपस्थित केला होता. कोलंबो गॅझेटच्या बातमीनुसार श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे की इमरान खान यांचे संबोधन वगळता बाकी कार्यक्रम ठरल्यानुसारच होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी