Srilanka Blast : भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक; ट्विटरवर भावनांना दिली मोकळी वाट

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 21, 2019 | 20:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Srilanka Blast : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांविषयी जगभरातून निंदा केली जात आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी श्रीलंकेचे खूप दौरे केले आहेत. घटनेनंतर त्यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.

Srilanka blast Indian cricketers given condolences
श्रीलंका स्फोटांविषयी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक   |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या इतिहासात २१ एप्रिल हा दिवस काळा दिवस म्हणून लिहिला जाईल. श्रीलंकेसाठी आजचा दिवस एवढा रक्तरंजित असेल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. एका पाठोपाठ एक अशा आठ बॉम्बस्फोटांनी श्रीलंका देश हादरला आहे. या स्फोटांमध्ये मृत्यमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांची संख्या अंगावर काटा आणणारी आहे. आतापर्यंत यात १६५ जणांचा मृत्यू झाला असून, ४००हून अधिक माणसे जखमी झाली आहेत. याती अनेकजण गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मृतांमध्ये ३५ जण विदेशी असल्याचं सांगितलं जातंय.

श्रीलंकेतील या साखळी स्फोटांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेशी क्रिकेटच्या माध्यमातून भारताचे चांगले संबंध असल्याने क्रिकेट जगातून या स्फोटांविषयी तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच मृत आणि जखमी नागरिकांविषयी भावना व्यक्त केल्या जात आहेत. भारताचा कॅप्टन विराट कोहलीने ट्विटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रीलंकेच्या बातमीने धक्का बसला आहे. या घटनेतील पीडितांच्या पाठिशी माझ्या प्रार्थना आहेत. मी त्यांच्यासोबत आहे, अशा शब्दांत विराटने ट्विट केले आहे. 

 

 

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंदुलकर ही स्वतःला आपल्या भावना व्यक्त करण्यापासून रोखू शकला नाही. त्यानेही ट्विट करून भावनांना मोकळी वाट करून दिली.

 

 

एका सुंदर देशात हे साखळी बॉम्बस्फोट घडले आहेत. माझे विचार आणि भावना यावेळी श्रीलंकेतील नागरिकांच्या पाठिशी आहेत, अशा शब्दांत रोहित शर्माने ट्विट केले आहे.

 

 

तर भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंगनेही या घटनेचा निषेध केला असून, पीडितांविषयी शोक व्यक्त केला आहे.

 

 

बातमीची भावकी

हरभजनबरोबर व्हीव्हीएस लक्ष्मणनेही ट्विट केले आहे.

 

 

या खेळाडूंनी अनेकवेळा खेळाच्या निमित्ताने श्रीलंकेचा दौरा केला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. दरम्यान, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आतत्कालीन बैठक बोलवली होती. देशात मदतकार्यासाठी सैन्यदलाला तैनात करण्यात आले आहे. सर्वांत गंभीर म्हणजे, या हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. त्यामुळे हल्ला नेमका कशासाठी झाला हे कळत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Srilanka Blast : भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक; ट्विटरवर भावनांना दिली मोकळी वाट Description: Srilanka Blast : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांविषयी जगभरातून निंदा केली जात आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी श्रीलंकेचे खूप दौरे केले आहेत. घटनेनंतर त्यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.
Loading...
Loading...
Loading...