Srinagar freez : श्रीनगरमध्ये उणे ६ अंश से. तापमान, भारतात थंडीची लाट येणार

Srinagar freez at minus 6 degree : श्रीनगरमध्ये यंदाच्या वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. पारा शून्याच्या खाली उणे सहा अंश से. वर जाऊन थांबला. जलवाहिन्यांमध्ये पाणी गोठून गेले.

Srinagar freez at minus 6 degree
श्रीनगरमध्ये उणे ६ अंश से. तापमान, भारतात थंडीची लाट येणार 
थोडं पण कामाचं
  • श्रीनगरमध्ये उणे ६ अंश से. तापमान, भारतात थंडीची लाट येणार
  • जलवाहिन्यांमध्ये पाणी गोठून गेले
  • अमरनाथ यात्रेच्या मार्गातील पहलगाम येथे उणे ८.३ अंश से. तापमानाची नोंद

Srinagar freez at minus 6 degree : श्रीनगर : श्रीनगरमध्ये यंदाच्या वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. पारा शून्याच्या खाली उणे सहा अंश से. वर जाऊन थांबला. जलवाहिन्यांमध्ये पाणी गोठून गेले. कारगील येथे उणे १३ अंश से., लेह येथे उणे १५ अंश से., द्रास येथे उणे १९.७ अंश से. तापमानाची नोंद झाली.

बारामुल्ला जिल्ह्यात उणे ८.५ अंश से. आणि अमरनाथ यात्रेच्या मार्गातील पहलगाम येथे उणे ८.३ अंश से. तापमानाची नोंद झाली. कुपवाडा येथे उणे ६.१ अंश से. तापमान होते. काजीगुंड येथे उणे ६ अंश से. आणि कोकेरनाग येथे उणे ५.१ अंश से. तापमानाची नोंद झाली. जम्मू काश्मीरमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे लहान-मोठे साठे गोठून गेले. 

पुढील काही दिवस जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये कडाक्याची थंडी असेल, पारा आणखी घसरेल; असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होईल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारतातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस थंडीची तीव्रता वाढेल, असे हवामान विभागाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी