खाटूश्यामजी जत्रेत चेंगराचेंगरी; मंदिराचे दरवाजे उघडताच घडली घटना, 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू

राजस्थानातील (Rajasthan) सीकर (Sikar) येथील खाटूश्यामजी (Khatu shyamji Temple ) मंदिरात चेंगराचेंगरीची (stampede) घटना घडली असून यात तीन महिलांचा (women) मृत्यू झाला आहे. अनेकजण यात जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात (hospital) उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातं आहे.

stampede at Khatushyamji fair; 3 women died of suffocation
खाटूश्यामजी जत्रेत चेंगराचेंगरी; 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • या दुर्घनटेत जीव गमावलेल्या महिलांपैकी एक महिला ही हिसारची असल्याची माहिती समोर आली आहे.
  • श्रावणी सोमवार निमित्त अनेक मंदिरात भाविकांची गर्दी होत असते.
  • खाटूश्यामजी मंदिरात दर महिन्याला जत्रा भरत असते.

नवी दिल्ली : राजस्थानातील (Rajasthan) सीकर (Sikar) येथील खाटूश्यामजी (Khatu shyamji Temple ) मंदिरात चेंगराचेंगरीची (stampede) घटना घडली असून यात तीन महिलांचा (women) मृत्यू झाला आहे. अनेकजण यात जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात (hospital) उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातं आहे.

खाटूश्यामजी मंदिरात दर महिन्याला जत्रा भरत असते. या मासिक जत्रेसाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीदरम्यान गोंधळ उडाला आणि चेंगराजेंगरीची घटना घडली. सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान, ही दुःखद घटना घडली. श्रावणी सोमवार असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. पहाटे पाच वाजता जेव्हा मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडण्यात आले तेव्हा भाविकांनी एकच गोंधळ गेला. गर्दी असल्यानं गोंधळ वाढला आणि चेंगराचेंगराची घटना घडली. 

Read Also : पालघर जिल्ह्यातील हिंदूंच्या धर्मांतराचा डाव उधळला

या दुर्घनटेत जीव गमावलेल्या महिलांपैकी एक महिला ही हिसारची असल्याची माहिती समोर आली आहे. तर अन्य दोन महिलांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी जयपूरला पाठवण्यात आले आहे. तर एकावर खाटू श्यामजी स्थानिक रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. आता पोलिसांकडून या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी चौकशी केली जातं आहे.

Read Also : पुढील 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

श्रावणी सोमवार निमित्त अनेक मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच तयारीही मंदिर प्रशासनाकडून केली जाते. मात्र खाटू श्यामजी मंदिरात घडलेल्या दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जातं आहे.दरम्यान, या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

तसंच जखमी भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थनाही केली आहे. तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून सर्व प्रशासकीय यंत्रणांना मदतीचे निर्देशही जारी केलेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी