stampede in Balaji Temple : मोफत दर्शन टोकनसाठी भाविकांची धावाधाव, चेंगराचेंगरीमध्ये तीन जण जखमी

आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) तिरुपती (Tirupati) स्थित तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात (Tirumala Venkateshwara Temple) मंगळवारी दुपारी चेंगराचेंगरी झाली. त्यात 3 भाविक जखमी झाले.  मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भाविक दर्शनाचे मोफत तिकीट (Tickets) काढण्यासाठी आले होते.

stampede in Balaji Temple
दर्शन टोकनसाठी भाविकांची गर्दी, बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • दोन दिवसांनंतर मोफत दर्शनाचे टोकन जारी करण्यासाठी मंगळवारी हे काउंटर सुरू करण्यात आले होते.
  • आज तिरुपतीमधील तिन्ही तिकीट काउंटरवर प्रचंड गर्दी होती.

हैदराबाद: आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) तिरुपती (Tirupati) स्थित तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात (Tirumala Venkateshwara Temple) मंगळवारी दुपारी चेंगराचेंगरी झाली. त्यात 3 भाविक जखमी झाले.  मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भाविक दर्शनाचे मोफत तिकीट (Tickets) काढण्यासाठी आले होते, त्यामुळे तिकीट काउंटरवर मोठी गर्दी झाली होती. दोन दिवसांनंतर मोफत दर्शनाचे टोकन जारी करण्यासाठी मंगळवारी हे काउंटर सुरू करण्यात आले होते. ते घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली त्यामुळे ही घटना घडली. सुदैवाने सुरक्षा रक्षकांनी वेळीच स्थितीवर नियंत्रण मिळवले.

स्थिती झाली सामान्य : TTD

तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे पीआरओ रवी कुमार म्हणाले, "आज तिरुपतीमधील तिन्ही तिकीट काउंटरवर प्रचंड गर्दी होती. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही भाविकांना विनातिकीट दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. सध्या परिस्थिती सामान्य असून भाविक आरामात देवाचे दर्शन घेत आहेत.

केला होता वेळेत बदल 

परमेश्वराच्या या मंदिरात सर्वदर्शनाची सोय आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम भक्तांना मोफत दर्शन देते. सर्व दर्शनमची वेळ आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी बदलत राहते. तत्त्वज्ञानाच्या इतर पद्धतींपेक्षा यामध्ये क्रमांक मिळण्यास जास्त वेळ लागतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी