Stampede in Mata Vaishno Devi Bhawan : वैष्णोदेवी भवनात चेंगराचेंगरी, १२ ठार

Stampede in Mata Vaishno Devi Bhawan 12 pilgrims killed PM Modi expressed grief : जम्मू काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवी भवनच्या प्रवेशद्वार क्रमांक तीन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला आणि २६ जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Stampede in Mata Vaishno Devi Bhawan 12 pilgrims killed PM Modi expressed grief
वैष्णोदेवी भवनात चेंगराचेंगरी, १२ ठार 
थोडं पण कामाचं
  • वैष्णोदेवी भवनात चेंगराचेंगरी, १२ ठार
  • मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे
  • २६ जण जखमी, जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर

Stampede in Mata Vaishno Devi Bhawan 12 pilgrims killed PM Modi expressed grief : कटरा : जम्मू काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवी भवनच्या प्रवेशद्वार क्रमांक तीन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला आणि २६ जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मदतकार्य सुरू आहे. अनेक जखमींना कटरा येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे. 

नव्या वर्षाची सुरुवात माता वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. लवकर दर्शन घेण्यासाठी काही जणांनी घाईने पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि चेंगराचेंगरी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या प्रकरणी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जाईल तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची चौकशी करुन चेंगराचेंगरीचे कारण शोधले जाईल. 

चेंगराचेंगरीचे वृत्त येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. तसेच सरकारने मृतांच्या नातलगांना भरपाई तर जखमींना उपचारांसाठी मदत जाहीर केली.

चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या जवळच्या नातलगांना नियमानुसार दहा-दहा लाख रुपये आणि जखमींना उपचारांसाठी दोन-दोन लाख रुपये देणार असल्याची घोषणा जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली. पंतप्रधान निधीतून मृतांच्या जवळच्या नातलगांना नियमानुसार दोन-दोन लाख रुपये आणि आणि जखमींना उपचारांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी