स्टीलच्या कचऱ्यापासन बनविणार पावसात खराब न होणारे रस्ते; टिकण्याबरोबर चमचम करणार roads

आता कितीही मुसळधार पाऊस (rain) झाला तरी रस्ते खराब होणार नाहीत. इतकेच नाही तर रस्ते (Roads) टिकण्याबरोबर चमकणार आहेत. त्याचं कारण आहे, आता रस्ते बनविण्यासाठी खडी, वाळूऐवजी स्टीलच्या (Steel) (पोलाद) कचऱ्यापासून बनवण्यात येणार आहेत. दरवर्षी, देशभरातील स्टील प्लांट्सद्वारे (Steel plants) 19 दशलक्ष टन स्टील कचरा तयार केला जातो. यातील बहुतांश कचरा लँडफिलमध्ये जमा होतो. तथापि, या स्टील स्लॅगला नवीन जीवन देण्याचा एक मार्ग शोधला गेला आणि अंमलात आला आहे.

Steel waste will make rain-proof roads; Roads will sparkle with durability
पावसाळ्यात टिकण्याबरोबर चमकणार रस्ते, जाणून घ्या कसं   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • गुजरातमधील हजीरा येथे स्टीलचा रोड बनविण्यात आला आहे.
  • हजीरा येथे पहिला 1.1 किलोमीटरचा रस्ता स्टील स्लॅगपासन बनवला आहे.
  • सीमा रस्ते संघटना(बीआरओ) अरुणाचल प्रदेशातील मुसळधार पावसाच्या क्षेत्रात स्टीलचा रस्ता स्टीलचा रस्ता बनवला जात आहे.

नवी दिल्ली : आता कितीही मुसळधार पाऊस (rain) झाला तरी रस्ते खराब होणार नाहीत. इतकेच नाही तर रस्ते (Roads) टिकण्याबरोबर चमकणार आहेत. त्याचं कारण आहे, आता रस्ते बनविण्यासाठी खडी, वाळूऐवजी स्टीलच्या (Steel) (पोलाद) कचऱ्यापासून बनवण्यात येणार आहेत. दरवर्षी, देशभरातील स्टील प्लांट्सद्वारे (Steel plants) 19 दशलक्ष टन स्टील कचरा तयार केला जातो. यातील बहुतांश कचरा लँडफिलमध्ये जमा होतो. तथापि, या स्टील स्लॅगला नवीन जीवन देण्याचा एक मार्ग शोधला गेला आणि अंमलात आला आहे.

सीमा रस्ते संघटना(बीआरओ) (Border Roads Association) अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) मुसळधार पावसाच्या क्षेत्रात स्टीलचा रस्ता बनवला जात आहे. याआधीही गुजरातमधील हजीरा येथे स्टीलचा रोड बनविण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेने काही मुख्य स्टील उत्पादक कंपन्या आणि पोलाद मंत्रालयाच्या मदतीने हजीरा येथे 1.1 किलोमीटरचा रस्ता स्टील स्लॅगपासन बनवला आहे. लोह खनिजापासून स्टील बनवल्यानंतर उरलेल्या टाकाऊ पदार्थाला स्लॅग म्हणतात. सीआरआरआयने रस्तेबांधणीत वाळू आणि खडीच्या जागी या कचऱ्याचा वापर केला आहे. 

Read Also : हिटमॅन रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांचा हॉटेलबाहेर गराडा

स्टील स्लॅगपासून बनविण्यात येणारा रस्ता सामान्य रस्त्याच्या तुलनेत अनेक पटीने अधिक मजबूत असल्याचे सिद्ध होत आहे. दरम्यान या कचऱ्याचा उपयोग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांतही करण्यात येईल. तसेच रेल्वे रुळाच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या खडीच्या ठिकाणीही याचा वापर करण्याची योजना आहे. दरम्यान या तंत्रज्ञानाचा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही समावेश करण्यात आला आहे. 

होतेय अतिरिक्त कमाई

केवळ सरकारी पोलाद कंपन्यांतच जवळपास 100 एकर जमिनीचा वापर या स्लॅगच्या साठवणुकीसाठी केला जात होता. खासगी कंपन्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन नाही. त्यामुळे त्या जागा  किरायाने घेऊन स्टीलच्या कचऱ्याची साठवणूक करत होत्या.  मात्र सीआरआरआयने शोधलेल्या तंत्रज्ञानाद्वारे या कचऱ्यातून 23 टक्के स्टील काढणे शक्य झाले असून  सोबतच उरलेल्या कचऱ्याचादेखील उपयोग होऊ लागल्याने अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे, असं पांडे यांनी सांगितले आहे.  

Read Also : पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

भारतातील पहिला स्टील रोड

संशोधनाचा एक भाग म्हणून अशा पहिल्या प्रकल्पाचा भाग म्हणून गुजरातमधील सूरत येथील हजीरा औद्योगिक परिसरात स्टीलच्या कचऱ्यापासून बनवलेला रस्ता तयार करण्यात आला. देशातील पहिला पोलाद रस्ता तयार करण्यासाठी कचरा म्हणून टाकून दिलेल्या स्टीलचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प पोलाद मंत्रालयाच्या सहाय्याने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CRRI) तसेच  नीती आयोग यांनी सहप्रायोजित केला आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या वेस्ट टू वेल्थ आणि स्वच्छ भारत मोहिमेसाठी सकारात्मक दिशेने टाकलेले पाऊल आहे. 

Read Also : लक्ष्मी माताला प्रसन्न करायचे असेल तर करा हे उपाय

एक किलोमीटर लांबीच्या प्रायोगिक प्रकल्पात सहा लेनचा समावेश आहे. हे संपूर्णपणे प्रक्रिया केलेल्या स्टीलचे बनलेले असून हा रस्ता बनविण्यासाठी पारंपारिक साहित्याला पर्याय म्हणून पूरक आहे. सीएसआयआरच्या म्हणण्यानुसार रस्त्याची जाडी देखील ३०% ने कमी करण्यात आली आहे. पावसाळ्या हा रस्ता उपयुक्त असून त्याकाळात या रस्त्याचे कोणतेच नुकसान होत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी