'या' क्षुल्लक कारणासाठी बापाने ४ वर्षाच्या मुलीची केली हत्या

Murder Case: चार वर्षाच्या मुलीने फुग्यासाठी हट्ट धरल्यानंतर तिच्या वडिलांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना प्रयागराजमध्ये घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

step father kills 4 year old girl in uttar pradesh 
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • सावत्र बापाने ४ वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना
  • फुग्यासाठी हट्ट धरल्याने आरोपी वडिलाने केली मुलीची हत्या
  • हत्येप्रकरणी सावत्र बापाला पोलिसांनी केली अटक

प्रयागराज: उत्तर प्रदेशमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सावत्र बापाने आपल्या चार वर्षीय मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मुलीने फक्त फुगा घेण्यासाठी हट्ट धरल्याने बापाने तिची हत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुलीच्या आईने असा दावा केला आहे की, मुलीने फक्त फुगा घेऊन द्यावा यासाठी हट्ट धरल्याने बापाने तिची हत्या केली. 

आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, मुलीच्या आईने मंगळवारी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, 'जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले त्यावेळी मुलीचा मृतदेह तिथे आढळून आला. तर आरोपी मात्र जखमी अवस्थेत तिथेच पडलेला होता. आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.' 

आरोपी आपल्या पत्नीसोबत खुल्दाबाद परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. खरं तर पती आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरु झालं. त्यानंतर पतीने आपल्या सावत्र मुलीला एका खोलीत नेलं. जेव्हा पोलीस तिथे पोहचले त्यावेळी मुलगी मृतावस्थेत आढळून आली. तर आरोपी जखमी अवस्थेत निपचीत पडून होता. 

मृत मुलीच्या आईने आपल्या जबाबात सांगितलं की, 'माझा पती आणि मी औषधं खरेदी करण्यासाठी बाहेर गेलो होतो. त्यावेळी माझ्या मुलीने फुग्यासाठी हट्ट धरला. त्यावेळी अचानक माझ्या पतीने मुलीला मारण्यास सुरुवात केली. जेव्हा मी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने बाइकवरुन मला धक्का देऊन खाली पाडलं आणि मुलीला सोबत घेऊन गेला. थोड्या वेळाने तो घरी परतला. त्यावेळी माझं त्याच्यासोबत याच गोष्टीवरुन भांडण झालं. त्यानंतर तो मुलीला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेला. त्यामुळे मी तात्काळ पोलिसांना फोन केला. पण तोवर त्याने मुलीचा जीव घेऊन स्वत:ला जखमी केलं होतं.' 

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास देखील सुरु केला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी