Attack On CM Convoy:नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक, स्थानिकांनी फोडल्या वाहनांच्या काचा; 11 जण ताब्यात

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 22, 2022 | 07:51 IST

Bihar Attack On CM Nitish Kumar's Convoy:या दगडफेकीत तीन-चार गाड्यांच्या काचा फुटल्या. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गौरी चुक पोलिस स्टेशन हद्दीतील सोहडी मोड येथे सायंकाळी 5 वाजता एका स्थानिक व्यक्तीच्या मृत्यूमुळे रस्ता अडवला जात असताना ही घटना घडली.

Attack On CM Convoy
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे.
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर रविवारी संध्याकाळी राजधानी पाटण्यात दगडफेक करण्यात आली.
  • या दगडफेकीत तीन-चार गाड्यांच्या काचा फुटल्या.

बिहार:  CM Nitish Kumar's Convoy Attacked: बिहारची (Bihar)  राजधानी पाटणामध्ये (Patna) मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar)  यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात नितीश कुमार यांच्या ताफ्यातील (convoy)  काही वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवानं हा हल्ला झाला तेव्हा मुख्यमंत्री नितीश ताफ्यात नव्हते. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना पाटणा जिल्ह्यातील गौरीचक पोलीस ठाण्याच्या सोहगी गावात घडली आहे. जिथे काही अज्ञात लोकांनी त्याच्या ताफ्यावर दगडफेक केली.

नेमकी घटना कशी घडली? 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर रविवारी संध्याकाळी राजधानी पाटण्यात दगडफेक करण्यात आली. मात्र, घटनेच्या वेळी मुख्यमंत्री नितीश कुमार ताफ्यात उपस्थित नव्हते. या दगडफेकीत तीन-चार गाड्यांच्या काचा फुटल्या. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गौरी चुक पोलिस स्टेशन हद्दीतील सोहडी मोड येथे सायंकाळी 5 वाजता एका स्थानिक व्यक्तीच्या मृत्यूमुळे रस्ता अडवला जात असताना ही घटना घडली.

अधिक वाचा- Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ११६४१ कोरोना Active, आज १८३२ रुग्ण, २ मृत्यू

सुदैवानं बचावले मुख्यमंत्री 

या ताफ्यात मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले सुरक्षा कर्मचारीच उपस्थित होते. आज नितीश कुमार बिहार जिल्ह्यातील गया येथे जाणार आहेत. ते तेथील दुष्काळी परिस्थितीबाबत बैठक घेणार असून तेथे बांधण्यात येत असलेल्या रबर डॅमचीही पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गयाला जाणार आहेत, पण हेलिपॅडवरून इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांची गाडी पटनाहून गयाला पाठवली जात होती.

11 जणांना अटक

पाटणाच्या डीएम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेसाठी एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 15 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 11 जणांना आधीच अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहत असून उर्वरित चार जणांना लवकरच पकडण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दगडफेकीत अनेक जण जखमी

तरुणाच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या पाटणा-गया मुख्य मार्गावर मृतदेह ठेवून रास्ता रोको करण्यात आला होता. याच निदर्शनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या रस्त्यावरून जाऊ लागल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ताफ्यावर दगडफेक केली. त्यामुळे अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेकीमुळे काही जण जखमीही झाले आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी