दिल्लीत हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक

Stone pelting sword and bullets were also fired on the procession of Hanuman Jayanti in Jahangirpuri Delhi : दिल्लीच्या जहांगिरपुरी परिसरात हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक झाली. या घटनेत काही पोलीस जखमी झाले.

Stone pelting sword and bullets were also fired on the procession of Hanuman Jayanti in Jahangirpuri Delhi
दिल्लीत हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक 
थोडं पण कामाचं
  • दिल्लीत हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक
  • पोलीस जखमी झाले
  • घटनेचे व्हिडीओ आणि फोटो तपासून कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले

Stone pelting sword and bullets were also fired on the procession of Hanuman Jayanti in Jahangirpuri Delhi : नवी दिल्ली : दिल्लीच्या जहांगिरपुरी परिसरात हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक झाली. या घटनेत काही पोलीस जखमी झाले. दगडफेक मुस्लिम तरुणांनी केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी केला. घटनेचे व्हिडीओ आणि फोटो तपासून कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले.

दगडफेक सुरू होताच तातडीने अतिरिक्त पोलीस बळ मागविण्यात आले. जहांगिरपुरी आणि आसपासच्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती दिल्ली पोलीस दलाचे आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिली. हिंसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारतात काही ठिकाणी श्रीराम नवमीच्या दिवशी (श्रीराम जयंती) शोभायात्रांवर दगडफेक झाली. आता हनुमान जयंतीच्या दिवशी (हनुमान जन्मोत्सव) दगडफेक झाली. विशेष म्हणजे श्रीराम नवमीच्या दिवशी (श्रीराम जयंती) झालेल्या दगडफेकीबाबत ट्विटरवर वेगळेच चित्र होते. दगडफेक सुरू असताना आणि त्यानंतरचे पुढील काही तास ट्विटरवर #IndiaMuslimUnderAttack आणि #MuslimGenocidelnindia तसेच #IndianMuslimGenocideAlert हे तीन हॅशटॅग ट्रेंड करत होते. ट्रेंड करत असलेल्या या हॅशटॅगसह केलेल्या अनेक ट्विटमध्ये भारतात घडलेल्या जुन्या घटनेचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला होता. अमेरिका, जर्मनी, कॅनडासह युरोपातील अनेक देशांतून भारतविरोधी ट्रेंडिंग हॅशटॅगचा वापर करून ट्विट सुरू होते. भारतात ठराविक नागरिकांकडून हे ट्वीट रीट्वीट करण्यात आले. घडलेली घटना आणि ट्विटरवरील ट्वीट यांच्यात मोठा फरक होता. या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केल्यास भारतविरोधी षडयंत्र अंमलात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या मनोज तिवारी यांनी दगडफेक प्रकरणी तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. 

दिल्ली भाजपच्या कपिल मिश्र यांनी हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवरील दगडफेक हा दहशत पसरविण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करून पोलीस तपासाची तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना एकमेकांचे हात धरून शांतता राखा (एक दूसरे का हाथ पकड़कर शांति बनाए रखें) अशा स्वरुपाचे आवाहन केले.  

दगडफेकीची घटना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. यानंतर पोलिसांनी तातडीने अतिरिक्त कुमक आणून कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी