Story of Gurugram flat number 901 where PA Sudhir had told himself Sonali Phogats husband : टिक टॉक स्टार ते भारतीय जनता पार्टीच्या हरयाणातील महिला नेत्या असा प्रवास करणाऱ्या सोनाली फोगाट यांचा गोवा येथील हॉटेलमध्ये मृत्यू झाला. आधी हृदयविकाराच्या झटक्याने सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण आता सोनाली फोगाट यांची हत्या झाल्याचा संशय अधिकाधिक भक्कम करणारी माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.
जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते
विमान प्रवासादरम्यान चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा...
तुम्हीही डिजिटल पेमेंट करता? मग ही बातमी वाचाच....
सोनाली फोगाट यांचा मॅनेजर किंवा पीए म्हणून काम करणारा सुधीर सांगवान, सुधीरचा मित्र सुखविंदर, ज्या हॉटेलमध्ये सोनाली यांचा मृत्यू झाला त्या हॉटेलचे मालक आणि एक ड्रग डीलर अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या चौघांना सोनाली फोगाट यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून अटक केली आहे. अटक केलेल्या चौघांची चौकशी सुरू आहे.
पोलीस तपास करत असतानाच सोनाली फोगाट यांच्याविषयी नवनवी माहिती प्रकाशात येत आहे. सोनाली फोगाट यांनी हरयाणातील गुरुग्राममधील सेक्टर १०२ मधील 'गुड़गांव ग्रीन्स' नावाच्या इमारतीत ९०१ क्रमांकाचा फ्लॅट भाडेपट्टीवर घेतला होता. या फ्लॅटच्या कागदपत्रांमध्ये सोनाली फोगाट आणि त्यांचे पती म्हणून सुधीर सांगवान या दोघांच्या नावाचा भाडेकरू असा स्पष्ट उल्लेख आहे.
इमारतीतले शेजारी सोनाली फोगाट आणि सुधीर सांगवान यांना पती पत्नी समजत होते. पण फोगाट कुटुंबातील सदस्य सोनाली यांचे सुधीर सांगवान यांच्याशी लग्न झालेले नाही असे सांगत आहेत. यामुळे सोनाली फोगाट आणि सुधीर सांगवान या दोघांच्या नात्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर सांगवान सोनाली फोगाट यांना तीन वर्षांपासून ब्लॅकमेल करत होता आणि त्याने शारीरिक छळ करून सोनाली यांच्यावर अत्याचार केले. सोनाली यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमा या सुधीर सांगवानमुळेच झाल्या आहेत. गोव्याच्या हॉटेलमध्ये असताना सुधीर आणि त्याच्या मित्राने संगनमताने सोनाली यांना जबरदस्तीने ड्रग्सचे सेवन करण्यास भाग पाडले, अशी माहिती पोलिसांच्या हाती आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीचा खरेखोटेपणा तपासण्याचे काम सुरू आहे.
गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये सोनाली फोगाट, सुधीर सांगवान आणि सुखविंदर आले होते त्या हॉटेलच्या मालकाचा सोनाली यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. याच कारणामुळे तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी हॉटेलच्या मालकाला अटक केली आहे. तपास पुढे सरकल्यावर आणखी चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास पोलिसांना आहे.
ज्या हॉटेलमध्ये सोनाली फोगाट यांचा संशयास्पद मृत्यू झाला त्या हॉटेलमधील सर्व सीसीटीव्ही फूटेज पोलीस तपासत आहेत. सीसीटीव्ही फूटेज बघितल्यानंतर मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी तपास पथकाने अटक केलेल्या चौघांची कसून चौकशी सुरू केली आहे.