Mahabharat style Marriage : भारतातील या भागात नवऱ्याचे भाऊ ‘भाऊजी’ नव्हे ‘पतीदेव’च असतात, वाचा सविस्तर

महाभारतात पाच पांडव आणि त्यांची एक पत्नी द्रौपदी होती. हीच प्रथा आजही हिमाचल प्रदेशात पाळली जाते. इथं कुठल्याही मुलीचं एखाद्या मुलाशी लग्न झालं की त्याचे सर्व भाऊदेखील तिचे पती असतात.

Mahabharat style Marriage
इथे नवऱ्याचे भाऊ ‘भाऊजी’ नव्हे ‘पतीदेव’च होतात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाभारताप्रमाणे इथे होतात लग्न
  • पतीचे सर्व भाऊही असतात पती
  • महिला असते कुटुंबप्रमुख

Mahabharat Style Marriage : भारत (India) हा विविधतेनं नटलेला देश आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या प्रांतात लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा आणि पद्धती असल्याचं दिसतं. वेगवेगळ्या समाजातही लग्नाच्या वैविध्यपूर्ण पद्धती (Various marriage styles) आपल्याला पाहता येतात. प्रत्येक पद्धतीचा एक इतिहास असतो आणि कुठल्या ना कुठल्या आख्यायिकेची पार्श्वभूमीही त्या घटनेला असते. हिमाचल प्रदेशातील लग्नाची अशीच एक पद्धत सर्वांना आश्यर्चचकित करणारी आहे. या भागात जेव्हा एखाद्या मुलीचं कुठल्याही मुलाशी लग्न होतं, तेव्हा त्या मुलाचे सगळे सख्खे भाऊ (Brothers of husband) हे सुद्धा तिचे पतीच होतात. म्हणजेच एखाद्या कुटुंबात जर एकापेक्षा अधिक सख्खे भाऊ असतील, तर त्या सर्वांचं एकाच मुलीसोबत (All marry same girl) लग्न करण्यात येतं. 

अशी आहे प्रथा

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात लग्नाची ही प्रथा आजही पाळली जाते. या पद्धतीत लग्न ठरवताना त्या घरात जितके भाऊ असतील, त्या सर्वांचं एकत्र लग्न करण्यात येतं. या पद्धतीला महाभारताची पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं जातं. जेव्हा पांडव अज्ञातवासात होते, त्यावेळी थंडीच्या काळात त्यांचा मुक्काम काही दिवस या भागातील एका गुहेत होता. पांडव हे पत्नी द्रौपदी आणि माता कुंतीसह या भागात राहिले होते. त्यामुळेच इथल्या लोकांनी ती पद्धत अंगिकारण्याचा निर्णय घेतला. या प्रथेला स्थानिक भाषेत ‘घोटुल’ असं म्हणतात. 

अधिक वाचा - Vice Presidential Election: उपराष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी १० ते ५ मतदान, संध्याकाळी मतमोजणी आणि निकाल; एनडीएच्या धनखरांचे पारडे जड

घोटुल प्रथा

घोटुल प्रथेनुसार एखाद्या कुटुंबात जितके भाऊ असतील, त्या सर्वांचं लग्न एकाच मुलीसोबत करण्यात येतं. त्यामुळे कुठल्याही मुलीला जर एखाद्या तरुणासोबत लग्न करायचं असेल, तर त्याच्या सर्व भावांसोबतही तिला लग्न करावं लागतं. सर्व भाऊ एकाच पत्नीसोबत वैवाहिक आयुष्य जगतात. जर लग्नानंतर एखाद्या भावाचा मृत्यू झाला, तर पत्नीला रडण्याचा किंवा विलाप करण्याचाही अधिकार नसतो. सर्व भाऊ आणि त्यांची पत्नी हे एकाच घरात, एकाच छताखाली राहून संसार करतात. आता अशा वैवाहिक आयुष्यात त्यांना एकांत कसा मिळणार, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं उत्तर आहे टोपी मर्यादा नावाची पद्धत.

अधिक वाचा - Breaking News 06 August 2022 Latest Update: डिसेंबर २०२३ पर्यंत राममंदिर पूर्ण होणार

टोपी मर्यादा

या प्रथेत सगळे पती हे टोपी मर्यादेचं पालन करतात. लग्न झाल्यावर जर एखाद्या पतीसोबत त्याची पत्नी खोलीत हजर असेल, तर तो पती तिच्या डोक्यावर आपली टोपी ठेवतो. हा एक संकेत असतो. या दोघांना एकांत हवा आहे, असा त्याचा अर्थ होतो आणि इतर भाऊ तिथून निघून जातात. या काळात इतर पती त्या खोलीत प्रवेश करू शकत नाहीत. परंपरेनुसार, लग्नासाठी सर्व भाऊ नवरदेव बनून एकाच वेळी लग्नासाठी पोहोचतात. या कुटुंबात महिला ही कुटुंबप्रमुख असते. महिलेला ‘गोयने’ असं म्हटलं जातं,तर कुटुंबातील वयाने सर्वात मोठ्या पतीला ‘गोर्यस’ असं म्हणतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी