Earthquake । दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत हादरला... , 30 सेकंदात 9 दगावले, लोकांनी रात्र काढली रस्त्यावर

Earthquake : दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी मोजण्यात आली आहे. त्याचे केंद्र अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश होता. भूकंपविज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 10:17 वाजता अफगाणिस्तानमधील कलाफगनपासून 90 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले.

Strong tremors of earthquake in entire North India including Delh
Earthquake । दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत हादरला... , 30 सेकंदात 9 दगावले, लोकांनी रात्र काढली रस्त्यावर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के
  • केंद्र अफगाणिस्तानात होते. मोठे नुकसान
  • पाकिस्तानमध्ये ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 इतकी होती.  या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हिंदूकुश प्रदेश होता. पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि पेशावरमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. आतापर्यंत भूकंपामुळे भारतात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (Strong tremors of earthquake in entire North India including Delh)

अधिक वाचा : राज्यभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, ठिकठिकाणी शोभायात्रा

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाकिस्तानमध्ये भूकंपामुळे 2 महिलांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये 160 लोक जखमी झाले आहेत.

अधिक वाचा : ऑस्ट्रेलिया रोखणार भारताचा विजय रथ?

भूकंपविज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील कलाफगनपासून 90 किमी अंतरावर रात्री 10:17 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. नोएडातील हाय राइज सोसायटीमधून ही फोटो समोर येत आहेत, ज्यामध्ये लोक घराबाहेर पडून रस्त्यावर तसेच गार्डनमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. भूकंप इतका जोरदार होता की लोक प्रचंड घाबरले.

अधिक वाचा : पाडव्या पूर्वीच सोने-चांदीच्या भाव वाढीची गुढी

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याशिवाय चमोली, उत्तरकाशीची गंगेची खोरे, यमुना व्हॅली, पंजाबमधील मसुरी, मोगा, भटिंडा, मानसा, पठाणकोट, मुरादाबाद, सहारनपूर, शामली आणि उत्तर प्रदेशातील जयपूर येथे भूकंपाचे धक्के जाणवले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी