UP Police Beaten To Students : प्रयागराज : राम राज्य आणि शांतेतची गप्पा करणाऱ्या योगी सरकारच्या यूपीमधील प्रयागराजमध्ये नोकरी मागणाऱ्या युवकांवर पोलिसांकडून मारहाण केली जात आहे. नोकरी न मिळाल्याने योगी सरकारच्या (Yogi Government) विरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आहेत. दिवसा रेल्वेस्थानकांवर (Railway station) हुसकवून लावल्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथील एका लॉजमध्ये घुसून विद्यार्थ्यांना (students) मारहाण केली गेली आहे.
पोलिसांचा (Police) मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात नोकऱ्यांअभावी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांनी सलोरी भागातील प्रयागर स्थानकात जोरदार आंदोलन केले. रेल्वे ट्रॅकवर उतरून विद्यार्थ्यांनी ट्रॅकवरच तळ ठोकला आणि बराच वेळ आंदोलन सुरूच ठेवलं होतं. नंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करून विद्यार्थ्यांना तेथून सोडवून घेतले. त्यानंतर समोर आलेले व्हिडिओ पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
यासंदर्भातले काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात पोलीस हॉस्टेलमध्ये घुसून आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढत आहेत, ज्यांनी रस्त्यावर गोंधळ निर्माण केला. काही पोलीस बंदुकीच्या बटाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसले, तर काही लाथा मारून दरवाजा तोडत होते. परिसरात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचा शोध घेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान याप्रकरणावरुन विरोधकांनी भाजप आणि योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली आहे.
प्रियंका गांधी यांनीही ट्विट करून या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, प्रयागराजमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या लॉज आणि हॉस्टेलची तोडफोड करणे आणि त्यांना मारहाण करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. प्रशासनाने ही जाचक कारवाई त्वरित थांबवावी. तरुणांना रोजगाराबाबत बोलण्याचा पूर्ण अधिकार असून या लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे.
हे आंदोलन NTPC च्या निकालाबाबत म्हणजेच RRB (रेल्वे भर्ती बोर्ड) मधील नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भर्ती संदर्भात केले जात आहे. मंडळाने शेवटच्या क्षणी नियमात बदल केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांनाच सेवेत घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मते, प्रत्यक्षात हा आकडा 20 टक्के असायला हवा होता. आता ती मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. घटनास्थळी विद्यार्थ्यांची संख्या अधिक वाढल्याने प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाठवला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना घटनास्थळावरून हटवण्यात आले. पण हे आंदोलन तिथेच संपलं नाही. नंतर पोलिसांनी हॉस्टेलम्ये प्रवेश केला आणि त्या निदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली.
प्रयागराजचे एसएसपी अजय कुमार यांनीही या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. अराजकता पसरवणार्यांची गय केली जाणार नाही आणि अनावश्यक बळाचा वापर करून दहशत पसरवणार्या पोलीस कर्मचार्यांनाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी असेही सांगितले की, विद्यार्थी वारंवार दगडफेक करत होते आणि त्यानंतर ते जवळच्या हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये लपून बसले होते, त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांना खोलीतून बाहेर काढण्याचे काम केले.