CBSE Exam । नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) टर्म २ च्या परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. विद्यार्थी टर्म १ च्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, वाढती कोरोना पेशंटची पाहता सीबीएसईच्या विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन परीक्षा न घेता ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी व्यक्त होत आहेत.
देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. देशभरात दररोज लाखो रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑफलाइन परीक्षा (CBSE Offline Exam) करणे योग्य नसून टर्म २ बोर्डाची परीक्षा एकतर स्थगित करावी किंवा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.
अधिक वाचा : Corona Effect On 12th Board Exams : 'या' राज्यात बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा रद्द
मला वाटते की सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवावर उठू नये , परीक्षा घेतली तर ती विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करावी. विद्यार्थ्यांनी आधीच ऑब्जेटिव्ह परीक्षा दिली आहे. त्यामुळे परीक्षा तर येत राहतील पण आपल्या आयुष्यापेक्षा दुसरे काही महत्त्वाचे नाही असे मला वाटते.' असे एका सीबीएसईच्या विद्यार्थ्याने ट्विट करत लिहिले आहे.
@cbseindia29 I know this Tweet will likely be unaddressed, but I as well as most of the students under CBSE schools insist that you cancel the second term exams scheduled to be conducted this year. If not a cancellation, conduct an online exam. Thank you. #cancelboardpariksha — Komyh1 (@microvighnn) January 17, 2022
एका विद्यार्थ्याने म्हटले आहे की, मी माझ्या शाळेतील बहुतांशी विद्यार्थ्यांशी बोललो त्यातील बहुतेक विद्यार्थ्यांचे मत आहे की यावर्षी होणारी दुसरी टर्म परीक्षा रद्द केली पाहिजे. रद्द करता येत नसेल तर ऑनलाइन परीक्षा घ्या.' अशाप्रकारचे अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये विद्यार्थी आपल्या मागण्या मांडत आहेत. मात्र बोर्डाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
#cancelboardexams2022 #cancelboardexam2022 #cancelboards2022 — avdhesh Tiwari (@2293_s11) January 15, 2022
or take it online.. pic.twitter.com/rqg03J5VyX
सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर टर्म २ बोर्ड परीक्षेसाठी नमुना पेपर्स प्रसिद्ध केले आहेत. यामुळे बोर्ड टर्म २ परीक्षा (CBSE Term 2 Exam)होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच तिसरी लाट नियंत्रणात आहे असे आरोग्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.