Subramanian Swamy यांनी पंतप्रधान Narendra Modi यांची रावणासोबत केली तुलना, म्हणाले पंढरपूरसह उत्तराखंडमध्ये मंदिरे पाडतायेत

Subramanian Swamy on PM Narendra Modi: सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट रावणासोबत केली आहे. 

Subramanian Swamy said modi is like ravan demolishing temples in varanasi destruct holy sites of pandharpur
Subramanian Swamy यांनी पंतप्रधान Narendra Modi यांची रावणासोबत केली तुलना, म्हणाले पंढरपूरसह उत्तराखंडमध्ये मंदिरे पाडतायेत 

Subramanian Swamy on Pandharpur Corridor: वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर बनवण्यात येणार आहे. मात्र, या कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. पंढरपूर येथे बनवण्यात येणाऱ्या कॉरिडॉरमुळे मंदिर परिसरात असलेले रस्ते 200 फूट वाढवण्याचे नियोजन आहे. मात्र, यामुळे शेकडो घरांचे भूसंपादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक दुकानदार, नागरिक यांनी याला विरोध केला आहे. याच मुद्द्यावरुन आता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनीही आक्रमक होत थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. (Subramanian Swamy said modi is like ravan demolishing temples in varanasi destruct holy sites of pandharpur)

सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट रावणासोबत केली आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट सुद्धा केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं, नरेंद्र मोदी रावणासारखे धार्मिक असल्याचा दावा करत उत्तराखंडमधील वाराणसी सारखे मंदिरे पाडत आहेत किंवा ती जागा बळकावत आहेत. आता पंढरपूर येथील पवित्र स्थळांची नासधूस करण्याची योजना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून आखली जात आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.

हे पण वाचा : तिशीनंतर प्रेग्नेंट होण्यासाठी सोप्या टिप्स

काय आहे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा?

वाराणसी कॉरिडॉर विकास योजनेच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा करण्यात येणार आहे. या संदर्भातील मंजूर आराखड्यात पंढरपूर शहरातील रस्ते, पूल, नदीकाठी घाट, 65 एकर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. शौचालये, पाणीपुरवठा, पालखी तळ विकास, भूसंपादन यासारख्या पायाभूत सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. 

हे पण वाचा : टाचांना पडलेल्या भेगा या उपायांनी झटक्यात होतील दूर

आराखड्यात मंजूर कामांपैकी 51 कामे पूर्ण झाली असून 6 कामे प्रगतीपथावर आहेत. मंजूर असलेली 4 विकास कामे आणि 7 पालखी तळांचे भूसंपादन करण्यासाठी अतिरिक्त निधी आवश्यस असल्याने नवीन आराखड्यात प्रस्तावित आहे.

हे पण वाचा : अंकशास्त्र : 2023 वर्ष तुमच्यासाठी कसे असणार?

मोर्चा आणि उपोषण

वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. मात्र, हा आराखडा राबवताना विठ्ठल मंदिर परिसरातील मिळकती बाधित होणार आहेत. त्यामुळे संबंधित मिळकतदारांसह व्यापाऱ्यांनी या आराखड्याला तीव्र विरोध केला आहे. त्यासाठी गठीत झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसर बचाव समितीने गेल्या 17 नोव्हेंबर रोजी पंढरपुरात मोर्चा काढला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी