UPSC Success Story : नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने सोमवारी नागरी सेवा, 2021 चा अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये दिल्लीच्या श्रुती शर्माने (Shruti Sharma) पहिला क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल, ती म्हणाली की तिला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची पूर्ण खात्री होती. मात्र तिला पहिला क्रमांक मिळण्याची खात्री नव्हती. (Success story of UPSC topper Shruti Sharma who studied in JNU & coaching from Jamia)
मूळ उत्तर प्रदेशातील श्रुती शर्माने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमी (RCA) मध्ये राहून नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. जामिया आरसीएमधून नागरी सेवांसाठी तयारी करणाऱ्या श्रुतीसह एकूण २३ उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. श्रुतीला भारतीय प्रशासकीय सेवेत, IAS मध्ये रुजू होऊन देशाची सेवा करायची आहे.
श्रुती शर्माने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, काही तांत्रिक बिघाडामुळे तिला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही. यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सल्ला देताना ती म्हणाली की, अभ्यास करताना किंवा तयारी करताना तास मोजण्याची गरज नाही. मात्र पॅटर्न तयार करून अभ्यास करण्याची गरज आहे.
अधिक वाचा : व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यू; रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे राहणारी श्रुती शर्मा इतिहासाची विद्यार्थिनी आहे. श्रुती शर्माने दिल्लीत राहून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सरदार पटेल विद्यालयातून तिने बारावी उत्तीर्ण केली. सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) एमए इतिहासात प्रवेश घेतला. मात्र, श्रुति ते पूर्ण करू शकली नाही.
अधिक वाचा : अफगाणिस्तानात जैश-ए-महंमद देतोय पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण; खळबळजनक अहवाल
या परीक्षेत श्रुती शर्मा हिने प्रथम क्रमांक पटकावला असून अंकिता अग्रवाल हिने द्वितीय व गामिनी सिंगला हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर चौथ्या स्थानावर ऐश्वर्या वर्मा, पाचव्या स्थानावर उत्कर्ष द्विवेदी, सहाव्या स्थानावर यक्ष चौधरी, सातव्या स्थानावर सम्यक एस जैनी, आठव्या स्थानावर इशिता राठी, नवव्या स्थानावर प्रीतम कुमार आणि दहाव्या स्थानावर हरकिरत सिंग रंधावा आहे.
मागील काही वर्षांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे यूपीएससीच्या (UPSC) परिक्षेत मुलींनी चांगलीच आघाडी घेतली आहे. टॉप 10 किंवा टॉप 50 जणांच्या यादीत मुलींची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. यंदाच्या यादीतदेखील टॉप 5 पैकी 4 मुलीच आहेत. यातून प्रशासकीय सेवांमधील महिलांचा हिस्सा वाढतो आहे. अधिकाधिक महिला प्रशासकीय अधिकारी तयार होताना दिसत आहेत. श्रुति शर्माच्या यशाच्या कहाणीने फक्त मुलींनाच नव्हे यूपीएससी परीक्षेत यश मिळवू इच्छिणाऱ्या सर्वांनाच मोठी प्रेरणा मिळणार आहे. शिस्तबद्धपणे आणि यूपीएससी परीक्षा समजून घेत अभ्यास केला असता यश मिळवता येते हे श्रुतिच्या यशातून दिसून आले आहे.