कोरोनाची लस टोचून न घेण्यासाठी कशा कशा सबबी आणि बहाणे, ऐकून आपणही व्हाल आश्चर्यचकित

देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र ज्या सहा शहरांमध्ये कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे तिथे 50%पेक्षाही कमी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली आहे.

Corona vaccine
कोरोनाची लस टोचून न घेण्यासाठी कशा कशा सबबी आणि बहाणे, ऐकून आपणही व्हाल आश्चर्यचकित 

थोडं पण कामाचं

  • कोव्हॅक्सिन न घेण्यासाठी लोक करत आहेत असे बहाणे
  • काय आहे या साशंकतेमागचे मोठे कारण?
  • सर्वेक्षणात कळला आरोग्य कर्मचाऱ्यांचा कल

Covishield vs. Covaxin: जेव्हापासून देशात कोरोनाचे लसीकरण अभियान (Corona vaccination drive) चालू झाले आहे तेव्हापासून जयपूरच्या (Jaipur) कांवटिया रुग्णालयातील परिचारिका (nurse) भवानी शर्मा दुहेरी भूमिका (double role) निभावत आहे. एकीकडे ती परिचारिका म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे तर दुसरीकडे आपल्या सहकाऱ्यांना कोव्हॅक्सिनची लस (Covaxin) घेण्यासाठी प्रेरित करत आहे. तिने शनिवारी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस (first dose) घेतला होता, मात्र तिचे सहकारी मात्र ही लस घेण्यास मागेपुढे करत आहेत. भवानी शर्मा या संपूर्ण रुग्णालयात सांगत आहेत की त्यांना या लसीचे काहीही साईड इफेक्ट (no side effects) झालेले नाहीत. कोव्हॅक्सिन लसीबद्दलची साशंकता (suspicions) आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही (health workers) अद्याप कायम आहे.

कोव्हॅक्सिन न घेण्यासाठी लोक करत आहेत असे बहाणे

बेंगळुरू महानगरपालिकेत्या एका आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांना कमीत कमी 20 असे आऱोग्य कर्मचारी भेटले ज्यांनी लस घेतल्याचे नाटक केले. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एका आरोग्य अधिकाऱ्याने तर परिचारिकेला असे सांगितले की त्याच्या हातावर कापसाचा बोळा धरून ठेवावा जेणेकरून लोकांना वाटेल की त्यांनी लस घेतली आहे. हैदराबादच्या सरकारी रुग्णालयांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 10-15% कर्मचारी वर्ग हा 16 जानेवारीपासून कामावरच आलेला नाही जेणेकरून त्यांना कोव्हॅक्सिनची लस घ्यावी लागणार नाही. दिल्लीत स्थानिक संस्थांनी केलेल्या एका सर्वेक्षणात 53% लोकांनी हे मान्य केले आहे की त्यांना लस घेण्याबद्दल साशंकता आहे तर 44% लोकांनी मात्र त्यांचा नंबर येताच लस घेणार असल्याचे सांगितले आहे.

काय आहे या साशंकतेमागचे मोठे कारण?

मुंबईच्या जे जे रुग्णालयात कोव्हॅक्सिनचे नोडल अधिकारी डॉ. ललित साळुंखे सांगतात, "काही प्रमाणात साशंकता आहे. आम्ही असेही पाहिले आहे की लोकांनी सरळ नकार दिला. मात्र यामागे कोविन अॅपमध्ये गोंधळ हेही एक कारण आहे. आम्ही लोकांना वेळेवर सांगू शकलो नाही." तर एम्स पाटणाचे वरिष्ठ निवासी डॉक्टर विनय कुमार यांनी म्हटले, " अनेक डॉक्टर आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ही लस घेण्यास तयार नाहीत कारण या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप प्रारंभिक पातळीवर आहे. अंतिम चाचणीनंतर कोव्हॅक्सिनची परिणामकारकता जवळपास 70% आहे. पुणे जिल्हा रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अशी भावना आहे की त्यांना गिनीपिगसारखे वापरून घेतले जात आहे.

सर्वेक्षणात कळला आरोग्य कर्मचाऱ्यांचा कल

भारताच्या ज्या सहा शहरांमध्ये कोव्हॅक्सिनची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे तिथे टाईम्स ऑफ इंडियाने एक सर्वेक्षण केले. यापैकी कोणत्याही शहरात 50%पेक्षा जास्त लोकांनी कोव्हॅक्सिनची लस घेतल्याचे आढळून आले नाही. सगळीकडेच लोकांनी कोव्हिशील्डच्या लसीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी