Summer Vacation: मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या कारणास्तव वाढवली उन्हाळ्याची सुट्टी

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 13, 2022 | 14:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

summer vacation 2022 west bengal । पश्चिम बंगाल मधील सरकारने राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळ्याची सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अति उष्णतेच्या कारणास्तव राज्य सरकारने शाळा सुरू होण्याची नवीन तारीख जाहीर केली आहे.

Summer vacation extended due to hot weather in West Bengal
पश्चिम बंगालमध्ये उष्णतेमुळे वाढवली उन्हाळ्याची सुट्टी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पश्चिम बंगालमध्ये उष्णतेमुळे वाढवली उन्हाळ्याची सुट्टी
  • शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मनीष जैन यांनी जारी केली सूचना.
  • कडक उन्हामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार उन्हाळी सुट्ट्या वेळेपूर्वीच जाहीर करण्यात आल्या होत्या.

summer vacation 2022 west bengal । कोलकाता : पश्चिम बंगाल मधील सरकारने राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळ्याची सुट्टी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अति उष्णतेच्या कारणास्तव राज्य सरकारने शाळा सुरू होण्याची नवीन तारीख जाहीर केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मनीष जैन यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार राज्यातील शाळांमधील उन्हाळी सुट्टी २६ जूनपर्यंत राहणार आहे. असे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Summer vacation extended due to hot weather in West Bengal). 

अधिक वाचा : प्रयागराजमध्ये दंगलीच्या मास्टरमाईंडचं घर जमीनदोस्त

राज्य सरकारचा मोठा निर्णय

लक्षणीय बाब म्हणजे मे महिन्यातील कडक उन्हामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार उन्हाळी सुट्ट्या वेळेपूर्वीच जाहीर करण्यात आल्या होत्या. कडक उन्हामुळे दिलेल्या सुट्टीचे पालकांनी स्वागत केले होते, मात्र विविध खासगी शाळांकडून शासनाच्या सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर खासगी शाळांना स्वतंत्र सूचना जारी करून माहिती देण्यात आली होती. असे असून देखील शासकीय आदेशाचे उल्लंघन चालूच राहिले असा अनेकवेळा आरोप केला जात आहे. 

उष्णतेच्या कारणास्तव वाढवली उन्हाळ्याची सुट्टी

आता पुन्हा एकदा राज्य सरकारने सुट्टीची मुदत वाढवली आहे. कडक उन्हामुळे संपूर्ण राज्यातील नागरिकांची दयनीय अवस्था असल्याकारणाने सुट्टी वाढवण्यात आली आहे. दरम्यान अति उष्णतेमुळे लहानग्यांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन सुट्ट्या वाढवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. लक्षणीय बाब म्हणजे २६ जूनपर्यंत सुट्ट्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र आता याचे पालन खासगी शाळा करतात की नाही हे पाहण्याजोगे असेल कारण खासगी शाळांकडून १६ जून पासून शाळा चालू करण्याच्या सूचना यापूर्वीच जारी करण्यात आल्या आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी