Supertech Twin Tower : दहा सेकंदात नष्ट होणार भारतातील दोन सर्वात उंच इमारती

Supertech twin tower demolition timeline buildings to be bulldozed in seconds : उत्तर प्रदेशमधील नोएडा शहरातील सेक्टर ९३ ए येथे असलेले सुपरटेक ट्विन टॉवर (भारतातील दोन सर्वात उंच इमारती) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ ऑगस्ट २०२२ रोजी नियंत्रित स्फोट करून पाडून टाकले जातील.

Supertech Twin Tower
दहा सेकंदात नष्ट होणार भारतातील दोन सर्वात उंच इमारती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दहा सेकंदात नष्ट होणार भारतातील दोन सर्वात उंच इमारती
  • नियंत्रित स्फोट करून पाडणार सुपरटेक ट्विन टॉवर
  • तयारी अंतिम टप्प्यात

Supertech twin tower demolition timeline buildings to be bulldozed in seconds : उत्तर प्रदेशमधील नोएडा शहरातील सेक्टर ९३ ए येथे असलेले सुपरटेक ट्विन टॉवर (भारतातील दोन सर्वात उंच इमारती) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ ऑगस्ट २०२२ रोजी नियंत्रित स्फोट करून पाडून टाकले जातील. दोन्ही इमारती प्रत्येकी ४० मजल्यांच्या आहेत. 

कोणत्या शहरात कोणते रुचकर पदार्थ खावे

विना कपडे या ठिकाणी बिनधास्त साजरा करा हनीमून

सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यासाठी रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या (RWA) अध्यक्षतेखाली आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आहे. इमारतींच्या अपेक्स (Apex) आणि सेयेन (Ceyane) भागांना पाडताक्षणी सुमारे ३५ हजार क्युबिक मीटर एवढा ढिगारा तयार होण्याची चिन्हं आहेत. हा ढिगारा तात्पुरता तळमजल्याच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवला जाईल. उर्वरित ढिगारा इतरत्र स्थलांतरित करण्यासाठीचे नियोजन सुरू आहे. शास्त्रोक्त पद्धतीने इमारत पाडल्यानंतर निर्माण होणाऱ्या ढिगाऱ्याची विल्हेवाट लावली जाईल.

सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यासाठीचे नियोजन (Supertech twin tower demolition timeline)

  1. रविवार २८ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुपरटेक ट्विन टॉवर नियंत्रित स्फोट करून पाडणार यासाठीचे नियोजन...
  2. सकाळी सहा वाजता पोलीस पथक सुपरटेक ट्विन टॉवर भोवतालच्या निश्चित केलेल्या परिसरातील नागरिकांचे तात्पुरते सुरक्षित ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात स्थलांतर करणार
  3. सकाळी साडेसहा वाजता एनडीआरएफचे पथक सोसायटीत पोहोचणार
  4. सकाळी सात वाजता सोसायटीच्या रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणार
  5. सकाळी नऊ वाजता सुपरटेक ट्विन टॉवर आणि भोवतालच्या निश्चित केलेल्या परिसराचा विजेचा आणि पाण्याचा पुरवठा बंद करणार
  6. दुपारी दोन ते दुपारी तीन या एक तासाच्या कालावधीसाठी एक्सप्रेस वे बंद राहणार
  7. दुपारी अडीच वाजता सुपरटेक ट्विन टॉवर पाडणार, पूर्ण प्रक्रिया बारा सेकंदांची आहे. यातील दहा सेकंदात स्फोट करून ढिगारा विशिष्ट ठिकाणी पाडण्यात येईल तर दोन सेकंद बटण दाबून स्फोटाची प्रक्रिया सुरू करण्याचा कालावधी आहे.
  8. दुपारी साडेतीन वाजता एनडीआरएफ, CBRI (Central Building Research Institute - CBRI) आणि इतर संबंधित अधिकारी घटनास्थळाची पाहणी करतील
  9. दुपारी सव्वाचार वाजता सोसायटी टास्क फोर्स घटनास्थळाची पाहणी करेल
  10. संध्याकाळी पाच वाजता सुपरटेक ट्विन टॉवर पाडल्यानंतर उर्वरित परिसराचा बंद केलेला विजेचा आणि गॅसचा पुरवठा पूर्ववत केला जाईल
  11. संध्याकाळी सात वाजता निवासी आपापल्या घरात परततील
  12. एमराल्ड कोर्ट (Emerald Court) येथील रहिवाशांची शेजारच्या निवासी सोसायटीत राहण्याची व्यवस्था केली जाईल.
  13. पार्सवनाथ प्रेस्टीज (Parsvnath Prestige) आणि पूर्वांचल सिल्व्हर सिटी येथील रहिवाशांसाठी रविवारी सरकारी यंत्रणा खाण्यापिण्याची व्यवस्था करणार
  14. धूळ माती यामुळे जे नागरिक आपल्या हक्काच्या घरात रविवारी रात्री पर्यंत परतू शकणार नाहीत त्यांच्यासाठी एक रात्र राहण्यासाठी व्यवस्था केली जाईल. धूळ मातीचा त्रास झाल्याने तब्येत बिघडलेल्यांवर उपचार करण्यासाठी सेक्टर १३७ मध्ये फेलिक्स हॉस्पिटल येथे ५० बेड राखीव.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी