1993 Mumbai Blasts : २५ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर अबु सालेमची सुटका करावी लागणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई १९९३ स्फोटांप्रकरणी दोषी असलेला गँगस्टर अबु सालेमला सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलाही दिलासा मिळालेला नाही. २०२७ ला अबु सालेमची सुटका २०३० पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. इतकेच नाही तर अबु सालेमने २५ वर्षाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

abu salem
अबु सालेम   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबई १९९३ स्फोटांप्रकरणी दोषी असलेला गँगस्टर अबु सालेमला सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलाही दिलासा मिळालेला नाही.
  • २०२७ ला अबु सालेमची सुटका २०३० पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
  • इतकेच नाही तर अबु सालेमने २५ वर्षाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

Abu Salem : नवी दिल्ली : मुंबई १९९३ स्फोटांप्रकरणी दोषी असलेला गँगस्टर अबु सालेमला सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलाही दिलासा मिळालेला नाही. २०२७ ला अबु सालेमची सुटका २०३० पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. इतकेच नाही तर अबु सालेमने २५ वर्षाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. 


अबु सालमे याने कोर्टात याचिका दाखल केली होती की त्याची २०२७ साली २५ वर्षांची शिक्षा पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपली सुटका व्हावी अशी मागणी सालेमने केली होती. पोर्तुगाल देशाने अबु सालेमला भारताकडे सुपुर्द केले होते. अबु सालेमला भारताकडे सुपुर्द करण्यापूर्वी पोर्तुगाल सरकारने भारत सरकारकडे अट ठेवली होती. अबु सालेमला मृत्यूदंडाची शिक्षा देणार नाही अशी अट पोर्तुगाल सरकारने ठेवली होती. भारताने ही अट मान्य करत अबु सालेमला भारतात आणले होते.  पोर्तुगालच्या तुरुंगात अबु सालमने तीन वर्ष बंद होता. परंतु ही शिक्षा भारतात अमान्य आहे. २००५ साली अबु सालेमचे प्रत्यार्पण झाले होते असे कोर्टाने म्हटले होते म्हणून २५ वर्ष झाल्यानंतर म्हणजेच २०३० साली अबु सालेमची सुटका करावी लागेल. यासाठी सरकारने निर्णय घ्यावा असेही कोर्टाने म्हटले आहे. 


पोर्तुगाल सरकारने ठेवली होती अट


२००५ साली पोर्गुगीज सरकारने अबु सालेम आणि त्याची प्रेयसी मोनिका बेदीला भारताकडे सोपवले होते. तेव्हा अबु सालेमला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येऊ नये अशी अट पोर्तुगाल सरकारने ठेवली होती. या अटीवरच अबु सालेमचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. १९९३ साली झालेल्या मुंबई स्फोटात अबु सालेमचा हात होता. इतकेच नाही तर खंडणीसाठी बिल्डर प्रदीप जैन आणि टी सीरीजचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येचाही आरोप आहे. इतकेच नाही तर खंडणीसाठी अबु सालेमने राकेश रोशन, सुभाष घई आणि राजीव राय यांच्यावरही हल्ले केले होते. पोर्तुगाल सरकारने अबु सालेम आणि त्याची प्रेयसी मोनिका बेदीला खोट्या पासपोर्ट प्रकरणी अटक केली होती.  २००५ साली अटी शर्तींसह अबु सालेम आणि मोनिका बेदीचे भारतात प्रत्यार्पण कराण्यात आले होते. 

सर्वोच्च न्यायालयाने सालेम प्रकरणी म्हटले की २५ वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर अबु सालेमची सुटका करावी लागेल. परंतु केंद्र सरकार संविधानाच्या कलम ७२ नुसार राष्ट्रपतीला सल्ला देऊ शकते. सालेमची शिक्षा पूर्ण होण्याच्या एक महिन्यापूर्वी केंद्र सरकार राष्ट्रपतींना योग्य कागदपत्र पाठवून योग्य कारवाई करू शकतात असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी