ठरलं, २८ ऑगस्टला पाडून टाकणार Twin Tower

Demolition of Supertech Twin Tower : सुपरटेक ट्विन टॉवर. उत्तर प्रदेशमध्ये नोएडा सेक्टर ९३ ए येथे आहेत हे टॉवर. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ ऑगस्ट २०२२ रोजी हे टॉवर नियंत्रित स्फोट करून पाडून टाकले जातील.

Demolition of Supertech Twin Tower
ठरलं, २८ ऑगस्टला पाडून टाकणार Twin Tower  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ठरलं, २८ ऑगस्टला पाडून टाकणार Twin Tower
  • उत्तर प्रदेशमध्ये नोएडा सेक्टर ९३ ए येथे आहेत
  • टॉवर नियंत्रित स्फोट करून पाडून टाकले जातील

Demolition of Supertech Twin Tower : सुपरटेक ट्विन टॉवर. उत्तर प्रदेशमध्ये नोएडा सेक्टर ९३ ए येथे आहेत हे टॉवर. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ ऑगस्ट २०२२ रोजी हे टॉवर नियंत्रित स्फोट करून पाडून टाकले जातील. जर २८ ऑगस्टला टॉवर पाडले नाही तर ४ सप्टेंबर २०२२ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत टॉवर पाडण्याचे काम पूर्ण करावे लागेल. आधी २१ ते २८ ऑगस्ट दरम्यान ट्विन टॉवर पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र तांत्रिक कारणामुळे टॉवर पाडण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली. 

सीबीआरआयने (Central Building Research Institute - CBRI) ट्विन टॉवर पाडण्याच्या प्रस्तावाला लेखी मंजुरी दिली आहे. पण सुपरटेक मॅनेजमेंटने पाडून टाकायच्या टॉवरच्या आसपासच्या बांधकामांचे ऑडिट पूर्ण करून सादर केलेले नाही. यामुळे ट्विट पाडण्याची मोहीम राबवताना आसपासच्या बांधकामांना किती त्रास होईल याचा नेमका अंदाज बांधणे कठीण 
झाले आहे. आता सुपरटेक मॅनेजमेंटने त्यांचा ऑडिट रिपोर्ट १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत सादर करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. यामुळे टॉवर पाडण्याच्या मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने बदल केला आहे. 

एडिफिसच्या उत्कर्ष मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार नियंत्रित स्फोट करून सुपटेक ट्विन टॉवर नऊ सेकंदात पाडले जातील. हे काम करण्यासाठी परदेशात अशा प्रकारचे काम करण्याचा मोठा अनुभव असलेल्या अभियंत्यांना बोलावले आहे. या अभियंत्यांच्या देखरेखीत नियंत्रित स्फोट केला जाईल. नियंत्रित स्फोटासाठी इमारतीत ठिकठिकाणी विशिष्ट स्फोटके पेरून इमारत विशिष्ट पद्धतीने पाडली जाईल.

इमारत पाडण्याचे काम सुरू असताना सुपरटेक ट्विन टॉवर आणि आसपासच्या भागात प्रवेश करण्यास सक्त मनाई केली जाईल. आवश्यक ते सुरक्षेचे उपाय करूनच इमारत पाडण्याचे काम पूर्ण केले जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी