Eknath shinde vs shiv sena Supreme Court: शिवसेनेच्या धनुष्यबाणाबाबत निकालापर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका: सुप्रीम कोर्ट

Shiv sena vs Eknath Shinde rebel mla supreme court hearing: शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात आज (४ ऑगस्ट) पुन्हा एकदा सुनावणी सुरु झाली आहे.

supreme court hearing maharashtra politics crisis shinde group vs uddhav thackeray shiv sena eknath shinde rebel mla harish salve
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु, हरीश साळवेंचा जोरदार युक्तिवाद 
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेच्या 16 आमदार अपात्र ठरविण्यात यावेत यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
  • सुप्रीम कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी
  • शिवसनेकडून कपिल सिब्बल लढवत आहेत केस

Supreme Court: मुंबई: शिवसेनेतील (Shiv Sena) तब्बल ४० आमदार (MLA) आणि एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन महाविकास आघाडी सरकार पाडलं. ज्यानंतर शिंदेंनी भाजपच्या (BJP) सोबत युती करत सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकारच बेकायदेशीर असल्याची याचिका शिवसेनेकडून दाखल करण्यात आली आहे. काल या याचिकेवर बराच वेळ सुनावणी झाली. पण ही सुनावणी काल पूर्ण झाली नाही. त्यामुळे आज (४ ऑगस्ट) पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने अत्यंत महत्त्वाचे असे निर्देश यावेळी दिले आहेत. (supreme court hearing maharashtra politics crisis shinde group vs uddhav thackeray shiv sena eknath shinde rebel mla harish salve)

राज्यातील सत्तासंघर्ष हा सुप्रीम कोर्टात असून अद्याप त्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. ही याचिका पाच न्यायधीशांच्या खंडपीठाकडे द्यायची का? यावर कोर्ट सोमवारी (८ ऑगस्ट) निर्णय देणार आहे. तसेच आजच्या सुनावणीत कोर्टात निवडणूक आयोगाने देखील आपली बाजू मांडली. यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला स्पष्ट शब्दात सांगितलं की, सध्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची यासाठी याचिकार्त्यांना अजून काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.

LIVE UPDATE: 

पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय निकाल येईपर्यंत घेऊ नका. ही याचिका मोठ्या खंडपीठाकडे द्यायची की नाही याबाबत सोमवारी निर्णय घेऊ. याप्रकरणी पुढील सुनावणी ही सोमवारी पार पडणार असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे आता पुढील सुनावणी ही ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे या सगळ्यात शिंदे सरकार हे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टाने काय-काय म्हटलं..?

निवडणूक आयोगाच्या वतीने अरविंद दातार यांचा युक्तिवाद 

- १० व्या सूचीचा काही परिणाम होऊ शकत नाही. कारण निवडणूक आयोग घटनात्मक स्वायत्त संस्था आहे.

- विधानसभेतील गोष्टीचा राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी संबंध नाही

- निवडणूक आयोग हे राजकीय पक्षाच्या अंर्तगत संबंधित आहे. 

- एवढंच निवडणूक आयोगाचं काम आहे. 

- एखादा गट राजकीय पक्षाचा दावा करत असेल तर निर्णय घ्यावा लागतो. 

- एखाद्या गटाने दावा केल्यानंतर चिन्ह कोणाकडे जाईल हे आम्हाला ठरवावं लागतं. 

- हा प्रश्न राजकीय आहे.

- विधिमंडळातील घडामोडींचा राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी संबंध नाही: निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा

अधिक वाचा: शिंदे सरकारचा विस्तार; शिंदे गटाला 40 टक्के वाटा

शिंदे गटाकडून हरीश साळवेंचा युक्तिवाद

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी