Rajiv Gandhi : राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्व आरोपींची सुटका, तमिळनाडूत फटाके फोडून जल्लोष

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सर्व सहा आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नलिनी आणि आरपी रविचंद्रनसोबत सर्व आरोपींना मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाचा आदेश आल्यानंतर एका तासात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व आरोपींची सुटका करण्यात आली आहे.

rajiv gandhi
राजीव गांधी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सर्व सहा आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने नलिनी आणि आरपी रविचंद्रनसोबत सर्व आरोपींना मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
  • कोर्टाचा आदेश आल्यानंतर एका तासात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व आरोपींची सुटका करण्यात आली आहे.

Rajiv Gandhi : नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सर्व सहा आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नलिनी आणि आरपी रविचंद्रनसोबत सर्व आरोपींना मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाचा आदेश आल्यानंतर एका तासात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व आरोपींची सुटका करण्यात आली आहे. (supreme court released all convicts of rajiv gandhu murder case)

अधिक वाचा : Nirav Modi Extradition: नीरव मोदी लवकरच भारतात येणार; लंडन उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज


सर्वोच्च न्यायालयाने १९ मे रोजी या प्रकरणी दोषी असलेला पेरारिवलना सोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा हवाला देत इतर आरोपींचीही सुटका करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. नलिनी आणि रविचंद्रन या आरोपींनी ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. 


मी दहशतवादी नाही

तुरुंगात सुटका झाल्यानंतर आरोपी नलिनी म्हणाली की मी दहशतवादी नाही. गेल्या ३२ वर्षांपासून मी तुरुंगात आहे आणि हा माझा संघर्षाचा काळ होता. ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिला माझ्यासोबत उभे राहिले त्यांची मी आभारी आहे असे नलिनी म्हणाली. तसेच माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे सर्व तमिळनाडूची जनता आणि वकिलांचे आभार मानते असेही नलिनी म्हणाली. 

काँग्रेसच निर्णयाला विरोध

काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशवासियांच्या भावना लक्षात न घेता हा निर्णय दिल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली आहे. तसेच या निर्णयात अनेक चुका आहेत असेही रमेश यांनी नमूद केले आहे. 

अधिक वाचा : Earthquake and Chandra Grahan : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे भूकंप? काय आहे ग्रहण आणि भूकंपाचं कनेक्शन?

मुख्यमंत्री स्टालिनकडून स्वागत

राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांची सुटका झाल्यानंतर तमिळनाडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

सोनिया गांधी यांनी केले होते माफ

राजीव गांधी हत्येप्रकरणी जेव्हा नलिनीला अटक केली होती तेव्हा ती गरोदर होती. तेव्हा राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी नलिनी गांधी यांना माफ केले होते. नलिनीच्या चुकीची शिक्षा एका बाळाला कशी देता येईल जे या जगात अद्याप आलेले नाही असे  मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी