विजय मल्ल्याला धक्का; तुरूंगवासासह ठोठावला दंड, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Vijay Mallya: विजय मल्ल्याकडून परदेशात हस्तांतरित केलेल्या 40 मिलियन डॉलर्सची रक्कमही 4 आठवड्यात कोर्टात भरण्याचे निर्देश देण्यात आलेत.

Vijay Mallya
विजय मल्ल्या 
थोडं पण कामाचं
  • सुप्रीम कोर्टानं फरार उद्योगपती विजय मल्ल्याला शिक्षा सुनावली आहे.
  • जर मल्ल्यानं दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.
  • न्यायमूर्ती यू.यू. ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टानं फरार उद्योगपती विजय मल्ल्याला शिक्षा सुनावली आहे. मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी 4 महिन्यांचा तुरूंगवासाची शिक्षा सुनावली त्यासोबतच कोर्टानं मल्ल्याला 2000 रूपयांचा दंडही ठोठावला आहे. जर मल्ल्यानं दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, तसंच मल्ल्याकडून परदेशात हस्तांतरित केलेल्या 40 मिलियन डॉलर्सची रक्कमही 4 आठवड्यात कोर्टात भरण्याचे निर्देश देण्यात आलेत. 

न्यायमूर्ती यू.यू. ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. देशाच्या सुप्रीम कोर्टानं 5 वर्षांपूर्वी 9 मे 2017 रोजी विजय मल्ल्याला अवमान प्रकरणी दोषी ठरवले होते. SBI च्या नेतृत्वाखालील बँकांच्या टीमनी दाखल केलेल्या खटल्यात न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करून USD 40 अमेरिकी डॉलर त्याच्या मुलांना हस्तांतरित केल्याबद्दल तो दोषी आढळला होता. पण मल्ल्याला आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

अधिक वाचा- Aadhaar Card शी मोबाईल नंबर लिंक करायचा आहे?, फॉलो करा 'ही' सोपी Process 

सुप्रीम कोर्टात खटल्याच्या सुनावणीदरम्यान विजय मल्ल्या उपस्थित नव्हते किंवा त्यांच्या बाजूनं देखील एकही वकील हजर नव्हते. या प्रकरणात केंद्र सरकारकडून विजय मल्ल्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली होती. मल्ल्यानं परदेशी खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याबद्दल कोर्टाला चुकीची माहिती दिली, त्याशिवाय गेल्या 5 वर्षांपासून कोर्टात हजर न राहिल्यानं आदेशांचा अवमान केला, असं केंद्र सरकारनं म्हटलं होतं. दरम्यान मल्ल्यानं दोन हजार रुपयांचा दंड न भरल्यास शिक्षेत आणखी दोन महिन्याची वाढ होणार आहे. 

विजय मल्ल्यानं केलाय 9 हजार कोटींचा घोटाळा

विजय मल्ल्या भारतीय बँकांचे 9000 कोटी घेऊन फरार झाला आहे..विजय मल्ल्यानं कोर्टाच्या अवमानाबद्दल कोर्टाची कधीच माफी मागितली नसल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. फरार उद्योगपती विजय मल्ल्याला 4 आठवड्यांच्या आत व्याजासह 40मिलियन अमेरिकन डॉलर पुन्हा जमा करण्यास सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. मल्ल्यानं तसं न केल्यास विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचं स्वातंत्र्य असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी