Mohammad Qureshi arrested पेट्रोल पंपावर पेटता फटाका टाकणाऱ्या मोहम्मद कुरेशीला अटक

Surat: Mohammad Qureshi arrested for throwing firecracker at petrol pump गुजरातमधील सुरत शहरात पेट्रोल पंपावर पेटता फटाका टाकणाऱ्या मोहम्मद कुरेशी नावाच्या तरुणाला स्थानिक पोलिसांनी अटक केली.

Surat: Mohammad Qureshi arrested for throwing firecracker at petrol pump
पेट्रोल पंपावर पेटता फटाका टाकणाऱ्या मोहम्मद कुरेशीला अटक 
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल पंपावर पेटता फटाका टाकणाऱ्या मोहम्मद कुरेशीला अटक
  • पेट्रोल पंपावरील घटनेचा व्हिडीओ व्हायरल
  • कलम २८५, २८६, ३३६ आणि ११४ अंतर्गत गुन्हा दाखल

Surat: Mohammad Qureshi arrested for throwing firecracker at petrol pump । सुरत: गुजरातमधील सुरत शहरात पेट्रोल पंपावर पेटता फटाका टाकणाऱ्या मोहम्मद कुरेशी नावाच्या तरुणाला स्थानिक पोलिसांनी अटक केली. पेट्रोल पंपावरील घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

पेट्रोल पंपावर मोहम्मद कुरेशी एका अल्पवयीन मुलासोबत दुचाकीवरुन आला. दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी दोघे तिथे थांबले. पेट्रोल भरुन झाल्यावर निघताना पेट्रोल पंपावर पेटता फटाका टाकण्याचा प्रकार घडला. पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या एका व्यक्तीने प्रसंगावधान राखून पायाने पेटता फटाका विझवला. यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणात पेट्रोल पंपाचे मॅनेजर मोतीलाल चौधरी यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली. 

पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि कलम २८५, २८६, ३३६ आणि ११४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पेट्रोल पंपावर पेटता फटाका टाकण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची सखोल चौकशी केली. चौकशीअंती दहावीत शिकत असलेल्या मुलाला सक्त ताकीद देऊन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. याच प्रकरणात मोहम्मद कुरेशी याला अटक करण्यात आली. कुरेशीने शिक्षण अर्धवट सोडले आहे. 

पेट्रोल पंपावरील घटनेवरुन सोशल मीडियात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पेटता फटाका पेट्रोल पंपावर टाकणे हे दहशतवादी कृत्य आहे. या प्रकारात मोठी जीवितहानी होण्याचा धोका होता. यामुळे आरोपी विरोधात कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी