Cyber security breach: लष्कराच्या सायबर सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा संशय; अनेक अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 19, 2022 | 15:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Army Cyber breach case | लष्कराच्या सायबर सुरक्षेत मोठा भंग होण्याची शक्यता आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाबाबत संरक्षण विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे की, हा भंग काही लष्करी अधिकाऱ्यांनीच केला आहे.

Suspected major mistake in Army cyber security Many officers are in a state of suspicion
लष्कराच्या सायबर सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा संशय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लष्कराच्या सायबर सुरक्षेत मोठा भंग होण्याची शक्यता आहे.
  • सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
  • हा भंग काही लष्करी अधिकाऱ्यांनीच केला आहे. असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Intel agencies unearth major cyber breach । नवी दिल्ली : लष्कराच्या सायबर सुरक्षेत मोठा भंग होण्याची शक्यता वर्तवली आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाबाबत संरक्षण विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे की, हा भंग काही लष्करी अधिकाऱ्यांनीच केला आहे. तसेच या प्रकरणात अधिकाऱ्यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती लीक केल्याची बाब समोर आली आहे. (Suspected major mistake in Army cyber security Many officers are in a state of suspicion). 

गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली भीती

वृत्तसंस्था एनआयने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी काही लष्करातील अधिकाऱ्यांनीच सायबर सुरक्षेचे उल्लंघन केल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणातील हेरगिरीचा शेजारी देशांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

अधिक वाचा : अमरावती हिंसे प्रकरणी भाजप नेत्याला अटक

प्रकरणाचा तपास सुरू 

सायबर सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत संरक्षण सूत्रांनी सांगितले की, लष्करी आणि गुप्तचर संस्थांनी तसेच काही लष्करी अधिकार्‍यांनी सायबर सुरक्षेचे उल्लंघन केल्याचा तपास केला आहे. ज्याचा शेजारी देशाच्या हेरगिरीशी संबंधित क्रियाकलापांशी संबंध असल्याचा संशय आहे. यासाठी काही व्हॉट्सॲप ग्रुप्सचा वापर करण्यात आला आहे. ज्यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचे उल्लंघन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लक्षणीय बाब म्हणजे लष्करी अधिकाऱ्यांशी संबंधित हेरगिरीची प्रकरणे कठोरपणे हाताळली जातात.

अधिकाऱ्यांना दिली जाते विशेष ट्रेनिंग 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना लष्करी अधिकाऱ्यांना वेळोवेळी नियम आणि आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, जेणेकरून ते शेजारील देशांच्या कटाला बळी पडू नयेत. अशी माहिती सूत्रांनी दिली. हे संपूर्ण प्रकरण ऑफिशियल सिक्रेट्स कायद्याच्या कक्षेत येते. यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची संवेदनशीलता आणि तपास पाहता कोणताही अंदाज बांधू नये, असेही लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. कारण तसे केल्यास प्रकरणाच्या तपासावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी