Suspended Rajya Sabha MPs : खाऊनपिऊन तृप्त होऊन आंदोलन करणारे राज्यसभा खासदार बघण्याची संधी भारतीयांना लाभली आहे. ज्या देशाने मागण्या मान्य व्हाव्या म्हणून उपोषण करणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांना बघितले त्याच देशाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पोटभर मांसाहार करून वर गाजर हलवा खाऊन आंदोलन करणारे राज्यसभा खासदार बघण्याची संधी लाभली आहे.
शिवसेना कोणाची? वाद सुरू असतानाच बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनेने घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
उद्धव ठाकरेंवर पुन्हा कुरघोडी! CM एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सचिव, प्रवक्ते आणि खजिनदारही बदलले
राज्यसभेतून निलंबित झालेल्या खासदारांनी संसदेच्या आवारात ५० तास आंदोलन केले. गांधी पुतळ्याजवळ खुल्या आकाशाखाली झोपलेले निलंबित खासदार गुरुवारी सकाळी उठल्यावर मोबाईलवर आपल्या आंदोलनाच्या बातम्या बघत असल्याचे दिसले.
राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत विरोधी पक्षांचे एकूण २० खासदार निलंबित झाले. निलंबित झालेल्या खासदारांना हा आठवडा संपेपर्यंत पावसाळी अधिवेशनासाठी राज्यसभेत उपस्थित राहण्यास मनाई आहे. निलंबित खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाचे सात, डीएमकेचे सहा, टीआरएसचे तीन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे दोन, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि आम आदमी पार्टी या दोन पक्षांचा प्रत्येकी एक खासदार यांचा समावेश आहे.
निलंबित खासदारांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी गांधी पुतळ्याजवळ तंबू उभारण्याची तयारी केली होती. पण संसदेच्या प्रशासनाने परवानगी नाकारली. पण निलंबित खासदारांना संसदेच्या लायब्ररीचे टॉयलेट वापरण्याची परवानगी देण्यात आली.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढून रात्री निलंबित खासदार काय करत होते त्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक केली. वृत्तसंस्थांच्या मीडिया टीमने घटनास्थळी उपस्थित राहून आंदोलन करत असलेल्या निलंबित खासदारांचे फोटो काढले आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले.
संसदीय कामकाज मंत्र्यांनी निलंबित खासदारांना उघड्यावर झोपू नका अशी विनंती केली होती. पण ही विनंती धुडकावून निलंबित खासदार संसदेच्या आवारात अंथरूण-पांघरूण घेऊन निवांत झोपले होते.
आंदोलन करून भूक लागल्यामुळे निलंबित खासदारांनी आंदोलनस्थळीच खाण्यापिण्याचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पाडला. खासदारांनी इडली सांबार, चिकन तंदुरी, गाजर हलवा या पदार्थांचा आस्वाद घेतला. पोटभर फळे खाल्ली.
डीएमके खासदार तिरूची सिवा यांनी निलंबित खासदारांसाठी सकाळी नाश्ता म्हणून इडली सांबारची व्यवस्था केली. दुपारी डीएमकेकडून दही भाताची व्यवस्था करण्यात आली. रात्रीच्या जेवणासाठी रोटी, दाल, पनीर, चिकन तंदुरी हे पदार्थ होते. डीएमकेच्या कनिमोझी (Kanimozhi Karunanidhi) यांनी सर्व निलंबित खासदारांसाठी गाजर हलवा आणला होता. आता गुरुवारी डीएमके सर्व निलंबित खासदारांना नाश्ता देणार आहे तर टीआरएस दुपारचे जेवण आणि आम आदमी पार्टी रात्रीचे जेवण देणार आहे.