नवी दिल्ली : भाजप नेत्याने (BJP leader) पैगंबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांचा अपमान केल्याप्रकरणी वाद वाढू लागला आहे. मुस्लीम सुमदायकाडून (Muslim community) नुपूर शर्मावर (Nupur Sharma) कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात असताना आता खासदार गौतम गंभीर (MP Gautam Gambhir) आणि स्वरा भास्कर (Swara Bhaskar) यांच्यात वाद सुरू झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) स्वरा भास्करने सोशल मीडियावर भाजप खासदार आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरवर टीका केली आहे. गौतमने पैगंबर मोहम्मदवर वक्तव्य करून वादात सापडलेल्या नुपूर शर्माला पाठिंबा देत एक ट्विट केले होते, जे पाहून अभिनेत्री स्वराने तिचा स्वर वाढवला होता. तिने गौतमवर जोरदार प्रहार करत गौतमचे 'सेक्युलर लिबरल्स' ट्विट शेअर केले. यासोबतच त्यांनी बुलडोझरचाही उल्लेख केला.
दरम्यान भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा प्रेषित मोहम्मद (Paigambar Muhammad Controversy) यांच्यावर वक्तव्य करून वादात सापडल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. यासोबतच मुंबई पोलिसांनी त्यांना समन्सही पाठवले आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणी गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेनंतर स्वरा भास्करने त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे.
भाजप नेत्याने पैगंबर मोहम्मद यांचा अपमान केल्याप्रकरणी वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. मुस्लिम समाजातील लोक नुपूर शर्माला कडाडून विरोध करत आहेत आणि तिला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. यासह अनेक राज्यांमध्ये हिंसाचार उसळला असून दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रयागराजमध्ये दगडफेकीचा मुख्य आरोपी जावेदच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलाय. आता याच प्रकरणी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक ट्विट केले असून, त्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. या वादावर स्वरा भास्करने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुपूर शर्माला पाठिंबा देत माजी क्रिकेटपटूने लिहिले की, 'माफी मागणाऱ्या महिलेविरुद्ध संपूर्ण देशात द्वेष आहे. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. यावर तथाकथित धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यांचे मौन बधिर करणारे आहे. गौतमचे हे ट्विट आपल्या इंस्टाग्राम स्टेटसवर शेअर करत स्वरा भास्कर संतापली आहे.
अभिनेत्री सर्व समकालीन मुद्द्यांवर मुक्तपणे मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडायला ती मागेपुढे पाहत नाही. गौतम गंभीरच्या ट्विटचा स्क्रीनशॉट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत स्वराने लिहिले की, 'त्यांना बुलडोझरचा आवाज ऐकू येत नाही, पण. 'मात्र, स्वराच्या या ट्विटवर गौतम गंभीरकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. याआधीही स्वरा भास्करने एक ट्विट केले होते, ज्यामध्ये तिने नुपूर शर्माच्या हिंसक निदर्शनाला विरोध केला होता.