दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ मे २०१९: मोदींचा शपथविधी सोहळा ते व्हॉट्सअॅपमधले नवे बदल

लोकल ते ग्लोबल
Updated May 26, 2019 | 22:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily Top News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ मे २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबईः आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आजची पहिली महत्त्वाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भातली. अखेर पंतप्रधान मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. मोदी येत्या आठवड्यात शपथ घेणार आहेत. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी आहे आरजेडचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. लालूंना लोकसभा निवडणूक निकालानंतर झटका बसल्याचं बोललं जातं आहे. यानंतरची वाईट बातमी आहे. अमेठीत रक्तरंजित राजकारण बघायला मिळालं आहे. अमेठीतील भाजपच्या नवविर्वाचित खासदार स्मृती इराणी यांचा निकटवर्तीय असलेल्या सुरेंद्र सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. चौथी आजची महत्त्वाची बातमी आहे दहशतवाद्यांबद्दल. केरळमध्ये किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंकेहून काही दहशतवादी येत असल्याची माहिती समोर आली आहे. पाचवी महत्त्वाची बातमी सर्वांच्या लाडक्या मॅसेजिंग अॅपबद्दलची आहे. आता व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये काही बदल दिसणार आहेत. आता या सर्व महत्त्वाच्या बातम्यावर सविस्तर जाणून घेऊया एका क्लिकवर.

या दिवशी मोदी दुसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथः पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदींसोबत अन्य केंद्रीय मंत्री देखील शपथ घेतील. कधी आणि कुठे घेतील मोदी पंतप्रधानपदाची शपथ जाणून घ्या. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

लालूप्रसाद यादव तणावात, प्रकृती खालावलीः राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालवली आहे. लोकसभा निवडणकीच्या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांनी एकवेळचं जेवणं बंद केल्याचं वृत्त समोर येत आहे. अधिक वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्याः उत्तरप्रदेशातील अमेठीत भाजप खासदार स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीयाची हत्या करण्यात आली आहे. सुरेंद्र सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. बातमी संदर्भातला व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

केरळ किनारीभागात हाय अलर्टः केरळमध्ये किनारपट्टीच्या भागात सुरक्षेसंबंधी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ISIS चे १५ अतिरेकी बोटीतून प्रवास करताना दिसले असल्याची माहिती गुप्तहेर खात्यानं दिली आहे. हे अतिरेकी श्रीलंकेहून आले आहेत. बातमी विस्तृतपणे वाचण्यासाठी क्लिक करा. 

 व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी महत्त्वाची बातमीः  व्हॉट्सअॅप सतत स्वत:ला अपडेट करत असतं. आता लवकरच व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या सर्व यूजर्सना व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये एक बदल झालेला बघायला मिळणार आहे. जाणून घ्या काय असेल हा बदल. अधिक बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ मे २०१९: मोदींचा शपथविधी सोहळा ते व्हॉट्सअॅपमधले नवे बदल Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
Loading...
Loading...
Loading...