Sweden Riots : स्वीडनमध्ये कुराण जाळल्याने उसळली दंगल, सौदी अरेबियाने केला निषेध

स्वीडनमध्ये रमजान महिन्यात मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुराण जाळण्यात आला आहे. यामुळे देशात दंगली उसळली असून त्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच तीन जणांवर गोळीबारही करण्यात आला आहे.

sweden riots
स्वीडनमध्ये कुराण जाळल्याने उसळली दंगल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्वीडनमध्ये रमजान महिन्यात मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुराण जाळण्यात आला आहे.
  • यामुळे देशात दंगली उसळली असून त्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
  • तसेच तीन जणांवर गोळीबारही करण्यात आला आहे.

Sweden Riots : स्टॉकहोम : स्वीडनमध्ये रमजान महिन्यात मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुराण जाळण्यात आला आहे. यामुळे देशात दंगली उसळली असून त्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच तीन जणांवर गोळीबारही करण्यात आला आहे. स्वीडनमधील उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी हे कुराण जाळल्याने मुस्लिम देश सौदी अरेबियाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणाचा निषेध करून मुद्दाम असे कृत्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार स्वीडनच्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या काही संघटनांनी कुराणच्या प्रती जाळल्या आहेत. त्यामुळे स्वीडनमध्ये दंगली उसळल्या असून हिंसाचार झाला आहे.  स्वीडनमधील कट्टर उजव्या विचारसणीचा पक्ष हार्ड लाईनने देशातील ठिकठिकाणी कुराण जाळण्यात आला, त्यामुळे देशात हिंसाचार उफाळला आहे. पक्षाचे नेते रासमस पलुदान यांनी अशा प्रकारे कुराण आपण जाळत राहू असे विधान केले आहे. 


कुराण जाळल्यानंतर देशात दंगल उसळली आहे. रविवारपर्यंत १६ पोलीस कर्मचारी या हिंसाचारा जखमी झाले आहे. जमावाने अनेक गाड्यांना आग लावली आहे. रविवारी स्वीडनच्या नोरशोपिंग शहरात हिंसा भडकली आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. 

स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डेलेना यांनी या हिंसेचा निषेध नोंदवला आहे. या हिंसाचारात तीन जण जखमी झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. या जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तीनही जणांना नंतर अटक करण्यात आली आहे. नोरशोपिंग भागात परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी