स्वित्झर्लंडमध्ये बुरखा, निकाबवर बंदी

Swiss citizens ban burqa via referendum देशाच्या सुरक्षेसाठी स्वित्झर्लंडमध्ये बुरखा, निकाब तसेच कोणत्याही प्रकारच्या मुखवट्याने चेहरा झाकण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

Swiss citizens ban burqa via referendum
स्वित्झर्लंडमध्ये बुरखा, निकाबवर बंदी 

थोडं पण कामाचं

  • स्वित्झर्लंडमध्ये बुरखा, निकाबवर बंदी
  • बंदी सर्व समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू
  • स्वित्झर्लंडमध्ये गेलेल्या पाहुण्या नागरिकांनाही बुरखा, निकाब बंदीचे पालन करावे लागणार

नवी दिल्ली: देशाच्या सुरक्षेसाठी स्वित्झर्लंडमध्ये बुरखा, निकाब तसेच कोणत्याही प्रकारच्या मुखवट्याने चेहरा झाकण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. बुरखा, निकाब बंदी संदर्भात झालेल्या मतदानात (सार्वमत) बहुमताने नागरिकांनी बंदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ही बंदी स्वित्झर्लंडमध्ये सर्व समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू आहे. कोणत्याही कारणाने विशिष्ट मुदतीसाठी स्वित्झर्लंडमध्ये गेलेल्या पाहुण्या नागरिकांनाही बुरखा, निकाब बंदीचे पालन करावे लागणार आहे. (Swiss citizens ban burqa via referendum)

धार्मिक कार्यात धार्मिक पेहेरावाचा भाग म्हणून तसेच आरोग्याच्या सुरक्षेसाठी मास्कने चेहरा झाकण्यास परवानगी

धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी धार्मिक पेहेरावाला परवानगी असेल. तसेच आरोग्याच्या सुरक्षेसाठी मास्क वापरता येतील. हे अपवाद वगळता सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहरा झाकण्यास बंदी आहे. स्वित्झर्लंडमध्ये ७ मार्च रोजी झालेल्या मतदानात (सार्वमत) ५१ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी बंदीला पाठिंबा दिला. याआधी युरोपमधील नेदरलँड (हॉलंड), जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जियम आणि डेन्मार्क या देशांमध्ये बुरखा आणि निकाबने चेहरा झाकवण्यावर बंदी आली आहे. 

युरोपमधील अनेक देशांमध्ये बुरखा आणि निकाबने चेहरा झाकवण्यावर बंदी

एका मागून एक युरोपमधील देशांमध्ये बुरखा आणि निकाबने चेहरा झाकवण्यावर बंदी लागू होत असल्यामुळे मुस्लिमांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आधुनिक विचारांच्या मुस्लिमांकडून बंदीचे स्वागत होत आहे. पण जुन्या विचारांच्या मुस्लिमांनी बंदीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. धार्मिक परंपरांमध्ये सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून अवास्तव हस्तक्षेप सुरू असल्याची टीका विरोधक करत आहेत. 

स्वित्झर्लंडमध्ये बारा वर्षांपूर्वी लागू झालेली मिनार बंदी

स्वित्झर्लंडमध्ये बारा वर्षांपूर्वी नव्याने मिनार बांधण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर आता स्वित्झर्लंडमध्ये बुरखा, निकाब तसेच कोणत्याही प्रकारच्या मुखवट्याने चेहरा झाकण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

स्वित्झर्लंडमध्ये २००९ पासून मिनार बंदी आणि २०२१ पासून बुरखा, निकाब तसेच कोणत्याही प्रकारच्या मुखवट्याने चेहरा झाकण्यास बंदी

ताज्या आकडेवारीनुसार स्वित्झर्लंडची लोकसंख्या ८६ लाखांपेक्षा जास्त आहे. या लोकसंख्येपैकी जेमतेम पाच टक्के नागरिक मुस्लिम आहेत. यामुळे २००९ पासून असलेली मिनार बंदी आणि २०२१ पासून लागू झालेली बुरखा, निकाब तसेच कोणत्याही प्रकारच्या मुखवट्याने चेहरा झाकण्यास असलेली बंदी लागू करणे स्वित्झर्लंडसाठी सोपे आहे, असे जाणकार म्हणाले. स्वित्झर्लंडमध्ये मुस्लिमांचा मोठा इतिहास नाही. यामुळेही स्वित्झर्लंडला मिनार बंदी आणि बुरखा, निकाब बंदी सारखे निर्णय घेणे आणि अंमलात आणणे इतर देशांच्या तुलनेत सोपे आहे, असे जाणकारांनी सांगितले.

बुरखा, निकाबवर स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षेसाठी बंदी

युरोपमध्ये २१व्या शतकात धार्मिक मुद्यांवरुन तणाव वाढण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. शिवाय बुरखा, निकाब सारख्या कपड्यांचा गैरवापर करुन स्वतःची ओळख लपवत दहशतवाद्यांनी घातपात केल्याच्या घटना घडल्या आहेत. याच कारणामुळे स्वित्झर्लंडसह युरोपमधील अनेक देशांमध्ये बुरखा, निकाब तसेच कोणत्याही प्रकारच्या मुखवट्याने चेहरा झाकण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी