Taiwan official death: तैवानच्या क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाचा संशयास्पद मृत्यू, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Taiwan missile scientist found dead in Hotel: तैवानच्या मुद्द्यावरुन चीन आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या वादा दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. तैवानमधील क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • तैवानच्या क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
  • हॉटेलमधील एका खोलीत आढळला मृतदेह
  • नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीन चांगलाच संतापला

Taiwanese official found dead: तैवानच्या मुद्द्यावरुन चीन आणि अमेरिका हे आमने-सामने आले आहेत. त्याच दरम्यान यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्याने हा वाद आणखी चिघळला. नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केलास अमेरिकेला त्याची किंमत मोजावी असा इशारा चीनने दिला होता. मात्र, चीनच्या या धमकीला भीक न घालता नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला. नॅन्सी पेलोसी यांच्या या दौऱ्यानंतर चीनचा चांगलाच तिळपापड झाला असून हा वाद आणखी वाढला आहे. त्याच दरम्यान आता तैवानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. तैवानच्या क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. (Taiwan missile development team official found dead in a hotel amid tension between china and us)

तैवानच्या क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाच्या मृतदेह हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. तैवानचे संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास युनिटचे उपप्रमुख ओ यांग ली-हिंग यांचा मृतदेह शनिवारी सकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये आढळून आला असं वृत्त समोर आलं आहे.

नॅशनल चुंग-शान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीचे उपप्रमुख पिंगटुंग हे दक्षिण तैवानच्या दौऱ्यावर होते. मात्र, हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. जेरुसलेम पोस्टच्या म्हणम्यानुसार, त्यांचा मृतदेह हा ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचं अधिकारी सांगत आहेत. तसेच ज्या हॉटेलमधील रूममध्ये ते राहत होते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संशयास्पद किंवा घुसखोरी झाल्याची चिन्ह आढळून आलेली नाहीयेत.

अधिक वाचा : China Taiwan Memes : WWIII सोशल मीडियावर ट्रेंड, नेटकर्‍यांनी शेअर केले भन्नाट मीम्स

मृतक अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना ह्रदयविकाराचा त्रास होता आणि त्यांना कार्डियाक स्टेंट सुद्धा लावण्यात आले होते. 

त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पांची देखरेख करण्यासाठीच्या पोस्टचा पदभार स्वीकारला होता. तैवानची लष्करी संस्था या वर्षी आपली क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता दुप्पट करण्यासाठी काम करत आहे. तैवानला सध्या चीनकडून धोका आणि लष्करी धमक्यांचा सामना करावा लागत आहे.

चीनची क्षेपणास्त्रे जपानच्या हद्दीत

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कारण, तैवानचे सैन्य सध्या अलर्ट मोडवर आहे. शेजारील चीन हा तैवानला घेरून आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव करत आहे. गुरुवारी चीनने डागलेली पाच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रेही जपानच्या हद्दीत पडली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी