IndiGo Flight: टेक-ऑफ करणाऱ्या विमानाच्या इंजिनला लागली आग, आगीच्या ठिणग्या दिसल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग

वृत्तानुसार, दिल्लीहून बंगळुरूकडे जाणाऱ्या  इंडिगोच्या विमानाने  6E-2131 साधारण 9 वाजून 45 मिनिटांनी आपले उड्डाण रद्द केले.  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचं पूर्ण इमर्जन्सी घोषित करण्यात आलं. सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्य सुरक्षित असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितले.

Take-off plane's engine caught fire
टेक-ऑफ करणाऱ्या विमानाच्या इंजिनला लागली आग  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • क्रूने व्यवस्थित परिस्थिती हाताळत सर्व प्रवशांना शांत केलं आणि त्यांची भिती घालवली.
  • विमानात 184 लोक बसले होते.
  • टेक-ऑफ करण्यासाठी काही मिनिटं बाकी असतानाचं विमानाला आग लागल्याचं दिसल्याने उड्डाण रद्द करण्यात आलं.

IndiGo Flight: दिल्लीहून (Delhi) बंगळुरूकडे (Bangalore)उड्डाण भरणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. आग लागल्यानंतर टेक-ऑफ रद्द करण्यात आलं आणि विमानाला विमानतळावर (airport)उभं ठेवण्यात आलं. सुदैवाने कोणतीच हानी झाली नसून या विमानात 184 लोक बसले होते. टेक-ऑफ करण्यासाठी काही मिनिटं बाकी असतानाचं  विमानाला आग लागल्याचं दिसल्याने उड्डाण रद्द करण्यात आलं.( Take-off plane's engine caught fire, flight canceled after sparks were seen)

अधिक वाचा  : गोल्डन बॉय नीरज चोप्रा मिळालं हॉलीवूडचं तिकिटं

वृत्तानुसार, दिल्लीहून बंगळुरूकडे जाणाऱ्या  इंडिगोच्या विमानाने  6E-2131 साधारण 9 वाजून 45 मिनिटांनी आपले उड्डाण रद्द केले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचं पूर्ण इमर्जन्सी घोषित करण्यात आलं. सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्य सुरक्षित असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितले.

विमानात बसलेल्या प्रवाशांपैकी एक प्रियंका कुमार यांनी ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये इंजिनमधून आग आणि ठिणग्या बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, "विमान अवघ्या पाच ते सात सेकंदात टेक ऑफ करणार होते तेव्हा अचानक मला विमानाच्या पंखांमधून ठिणग्या बाहेर पडताना दिसल्या, काही वेळाने आग लागली. त्यानंतर लगेचच विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.

अधिक वाचा  : जादुई ड्रेस पाहून सर्वचं झाले चकित

पायलटने आम्हाला सांगितले होते की, इंजिनमध्ये काही खराबी आहे. त्यांनी सांगितले की, ''तात्काळ अग्निशमन दल आले आणि विमान ग्राउंड करण्यात आले म्हणजे टेक-ऑफ घेत असलेल्या विमानाला खाली उतरवण्यात आले. सुरुवातीला प्रवाशांच्या मनात भिती दाटली होती, परंतु क्रूने व्यवस्थित परिस्थिती हाताळत सर्वांना शांत केलं आणि त्यांची भिती घालवली. विमानात अनेक वृद्ध लोक आणि लहान मुले होते. सर्वजण सुरक्षित आहेत.''

अधिक वाचा  : वाढत्या महागाईच्या काळात विजेची बचत करण्याच्या 5 टिप्स

इंडिगोच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करताना, असे म्हटले आहे की फ्लाइट क्रमांक 6E-2131दिल्लीहून बेंगळुरूला उड्डाण करणार होते. या विमानात तांत्रिक समस्या आल्याचं लक्षात आले. त्यानंतर लगेचच वैमानिकाने उड्डाण थांबवले आणि विमान ग्राउंड करण्यात आले.विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून, पर्यायी उड्डाणाची व्यवस्था करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी