अफगाणिस्तानमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांवर कारवाई करणार, तालिबानचे भारताला आश्वासन

Taliban assure India to act on Pakistan supported terror groups in Afghanistan : अफगाणिस्तानमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांवर कारवाई करणार असे आश्वासन तालिबानने भारताला दिले आहे. 

Taliban assure India to act on Pakistan supported terror groups in Afghanistan
अफगाणिस्तानमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांवर कारवाई करणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अफगाणिस्तानमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांवर कारवाई करणार
  • तालिबानचे भारताला आश्वासन
  • भारत आणि तालिबान यांच्यात सकारात्मक वातावरणात झाली चर्चा

Taliban assure India to act on Pakistan supported terror groups in Afghanistan : अफगाणिस्तानमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांवर कारवाई करणार असे आश्वासन तालिबानने भारताला दिले आहे. 

Pakistan: कराचीमध्ये हिंदू मंदिराची तोडफोड; पुजाऱ्याच्या घरावर हल्ला, मूर्तीची केली विटंबना

पाकिस्तानच्या सैन्याची शरणागती, पाकिस्तानमधील पश्तून भागात टीटीपीची सत्ता, शरियत कायदा लागू

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या कारवायांमुळे अफगाणिस्तानच्या प्रगतीत तसेच अफगाणिस्तानच्या परराष्ट्र, व्यापार आणि संरक्षण संबंधांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. ही बाब अफगाणिस्तानचे राज्यकर्ते असलेल्या तालिबानने गांभिर्याने घेतली आहे. अफगाणिस्तानच्या हिताआड येणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांवर कारवाई करू; अशी स्पष्ट ग्वाही तालिबानने दिली आहे.

भारताचे प्रतिनिधी नुकतेच तालिबानला अफगाणिस्तानमध्ये भेटले. ही भेट अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे झाली. भेटीदरम्यान भारताच्यावतीने सरकारी प्रतिनिधी जे. पी. सिंह यांनी तालिबानसोबत चर्चा केली. भारतीय शिष्टमंडळाला तालिबानने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.

तालिबानच्यावतीने अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी आणि संरक्षणमंत्री मुल्ला याकूब तसेच अंतर्गत व्यवहारमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांनी भारताच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. चर्चेत भारताकडून जे. पी. सिंह सहभागी झाले. जे. पी. सिंह हे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण अर्थात पीएआय विभागाचे संयुक्त सचिव आहेत. 

जे. पी. सिंह यांनी तालिबानशी संवाद साधण्याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची एक बैठक झाली. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांनी तालिबानची दहशतवादाविरोधात लढण्याची क्षमता वाढविण्यासाठी ठोस उपाय करण्याची आवश्यकता बोलून दाखविली होती. 

भारताने अलिकडेच अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गहू, कोरोना प्रतिबंधक लसचा साठा, औषधे, थंडीत वापरण्याचे कपडे अशा स्वरुपाची मदत पाठविली आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून दिलेल्या या मदतीचे तालिबानने स्वागत केले आहे. तसेच भारताचे मदतीसाठी जाहीर आभार  मानले आहेत. तालिबानने भारताला अफगाणिस्तानमधील त्यांच्या सर्व विकास योजना सुरू करण्याची विनंती केली आहे. तसेच अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावास आणि भारताची बंद केलेली इतर कार्यालये पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. 

अद्याप भारताने तालिबानच्या शासनाला मान्यता दिलेली नाही. मात्र तालिबानसोबत संवाद सुरू ठेवला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना आणि त्यांचे मदतनीस यांना अफगाणिस्तानच्या भूमीवर थारा मिळू नये अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे. तालिबानने भारताच्या भूमिकेची दखल घेऊन अफगाणिस्तानमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा बीमोड करण्याचे संकेत दिले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी