taliban chief haibatullah akhundzada asks officials to sack sons relatives who were given government job : तालिबानचे अनेक फतवे हे त्यांच्या मध्ययुगीन विचारांमुळे बदनाम झाले आहेत. पण तालिबानच्या अफगाणिस्तानमधील सर्वोच्च नेत्याने काढलेल्या एका फतव्याचे जगभर कौतुक होत आहे. हा फतवा नेपोटिझम विरोधात आहे.
प्रशासनात अधिकारी पदावर असलेल्या तालिबान्यांना त्यांच्या जवळच्यांना आणि नातलगांना सरकारी पदावर नियुक्त करता येणार नाही, असा फतवा अफगाणिस्तानमधील सर्वोच्च नेत्याने काढला आहे. ज्या अधिकारी तालिबान्यांचे जवळचे वा नातलग सरकारी पदावर आहेत त्यांना पदावरून बरखास्त करावे असेही या फतव्यात नमूद आहे. हा फतवा तालिबान नेता मुल्ला हिबतुल्लाह अखुंदजादाने काढला आहे.
नेपोटिझम विरोधातल्या मुल्ला हिबतुल्लाह अखुंदजादाच्या फतव्याचे जगभर कौतुक होत आहे. सोशल मीडियावर या फतव्याची चर्चा आहे. मुल्ला हिबतुल्लाह अखुंदजादाचा फतवा शनिवार 18 मार्च 2023 रोजी रात्री उशिरा अफगाणिस्तानमधील तालिबान सरकाने त्यांच्या अधिकृत हँडलवर ट्वीट केला. हा फतवा संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये तसेच अफगाणिस्तान सरकारशी संबंधित सर्व सरकारी विभागांमध्ये लागू आहे.
फतवा काढण्याचे कारण जाहीर करण्यात आलेले नाही. याआधीही अनेकदा तालिबानने कोणतेही कारण न देता फतवे काढले आहेत. पण यावेळी नेपोटिझम विरोधात फतवा असल्यामुळे तो विशेष ठरला आहे.
अफगाणिस्तानमधून 2021 मध्ये अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतली यानंतर देश ताब्यात घेणाऱ्या तालिबानच्यावतीने मार्च 2023 मध्ये नेपोटिझम विरोधात फतवा काढण्यात आला आहे.
वीजबिल पंख्याच्या स्पीडवर अवलंबून आहे का?
भारतात Long Drive ची मजा घेण्याची उत्तम ठिकाणे