धक्कादायक :   ७५ दिवसांच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, आईची पोलिसांकडे धाव 

तामिळनाडूच्या इरोडे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील ४० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी आपल्या ७५ दिवसांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपात अटक केली आहे.

tamil nadu 75 day old girl raped by father mother approaches police crime news in marathi
धक्कादायक :   ७५ दिवसांच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, आईची पोलिसांकडे धाव   |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • आई कामासाठी बाहेर गेली असतात बापाने चिमुरडीवर केला बलात्कार 
  • महिला कामावरून बाहेर आल्यावर तिला मुलीच्या गुप्तांगला जखम झाल्याचे दिसले
  • आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

चेन्नई  :  गेल्या सोमवारी तामिळनाडूच्या इरोडे जिल्ह्यातील अंदीयूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका ४० वर्षीय नराधम पित्याने आपल्या ७५ दिवसांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.  या संतापजनक कृत्यानंतर चिमुरडीच्या आईने पोलिसांकडे धाव घेत आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली. यानंतर महिला पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. 

या वेळी पीडित चिमुरडीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  ४० वर्षीय नराधम पित्याने मी घरात नसताना दोन आठवड्यापूर्वी माझ्या तान्हुल्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तो हा गुन्हा करण्यापूर्वी मी त्या ठिकाणी आली आणि त्याला असे करण्यापासून रोखले आणि इशारा दिला की माझ्या मुलीपासून दूर राहा. 

या संदर्भात पोलीस सबइन्स्पेक्टर एस. गजलक्ष्मी यांनी सांगितले की, गेल्या सोमवारी महिला काही कामासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी तीने आपल्या पतीला मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. 

परंतु, पत्नी घरी नाही, हे पाहून त्याने डाव साधला आणि ७५ दिवसांच्या चिमुरडीवर बलात्कार केला. काही काळानंतर महिला घरी परतली, त्यावेळी घडलेला प्रकार पाहून तिला धक्काच बसला. आपल्या मुलीच्या गुप्तांगाला जखमा झाल्याचे तिने पाहिले. 

या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर महिलेने चिमुरडीला अलामपलायम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मुलीला पुढील उपचारासाठी सेलमच्या मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्याचा सल्ला दिला. सध्या मुलीची प्रकृती स्थीर आहे. 

अटक झाल्यानंतर नराधम बापाने आपला अपराध मान्य केला आहे. पत्नी घरात नसल्याने आपण मुलीवर बलात्कार केल्याचे त्याने कबूल केले. आरोपीविरूद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी