भारतात रुग्णांचा आकडा वाढला... तामिळनाडूत कोरोनाचा पहिला बळी, मृतांचा आकडा 11 वर

कोरोनामुळे तामिळनाडूत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला असून देशातील आतापर्यंत 11 लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. कोरोनानं जगभरात हाहाकार पसरला आहे.

corona virus death
तामिळनाडूत कोरोनाचा पहिला बळी, मृतांचा आकडा 11 वर 

नवी दिल्लीः भारतामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता कोरोना रुग्णांचा आकडा 606 वर गेला आहे. तर कोरोनामुळे तामिळनाडूत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला असून देशातील आतापर्यंत 11 लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे.  कोरोनानं जगभरात हाहाकार पसरला आहे. जगभरात आतापर्यंत 18 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. 

कोरोनानं जगभरात हाहाकार पसरला आहे. जगभरात आतापर्यंत 18 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.  आज तमिळनाडूतील मदुरईमध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तमिळनाडूमधील राजाजी रुग्णालयात 54 वर्षांच्या व्यक्तीवर कोरोना व्हायरसचे उपचार सुरू होते.  उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 23 मार्चला त्याला राजाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.  तमिळनाडूचे आरोग्य मंत्री सी विजयाभास्कर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. वर्षीय व्यक्तीला डायबेटीस होता. त्यामुळे तो उपचाराला योग्य प्रतिसाद देत नव्हता अशी माहिती मिळत आहे.  हा रुग्ण परदेशातून आला होता, असं सूत्रांनी सांगितलं.  तामिळनाडूत एकूण १८ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी आज एकाचा मृत्यू झाला तर एक रुग्ण बरा झाला आहे.

काल मुंबईमध्ये एका व्यक्तीचा तर दिल्लीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एकूण 562 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 476 भारतीय नागरिक आहेत, तर 43 विदेशी नागरिक आहेत.  तर लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित केले आणि पंतप्रधानांनी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले. पंतप्रधान मोदी आपल्या म्हणाले की, आजपासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन करण्यात येणार आहे. भारतातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटना लक्षात घेता हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.पीएम मोदी म्हणाले की, हा लॉकडाऊन कर्फ्यूसारखाच असेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. परंतु या लॉकडाऊनने घाबरून जाण्याची गरज नाही. त्याचबरोबर सरकारने स्पष्ट केले की आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी उपलब्ध राहतील.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील खास मोठ्या गोष्टी जाणून घ्या:

  1. भारताला वाचवण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकास घराबाहेर पडण्यावर आज रात्री १२ वाजेपासून बंदी घातली जात आहे.

  2. पुढील २१ दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, जर आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी मोडण्यासाठी किमान २१ दिवसांचा काळ खूप महत्वाचा आहे.
  3. देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव, प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता, परिसर आता बंद असणार आहे.
  4. पीएम मोदी म्हणाले की, लॉकडाऊन हा कर्फ्यूसारखाच  असेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. परंतु या लॉकडाऊनने घाबरून जाण्याची गरज नाही.
  5. या लॉकडाऊनची देशाला एक आर्थिक किंमत सहन करावी लागेल, परंतु या क्षणी प्रत्येक भारतीयांचे प्राण वाचवणे ही माझी, भारत सरकारची, देशातील प्रत्येक राज्य सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.
  6. आपल्या समोर हा एकमेव मार्ग आहे असे आपण देखील गृहित धरावं, आपल्याला घराबाहेर पडायचे नाही, काहीही झालं तरी आपण घरातच राहिले पाहिजे.
  7. पीएम मोदी म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये घाबरून जाण्याची गरज नाही, आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी मिळतील
  8. रेशन, औषधे, रुग्णालये, फळे आणि भाजीपाला व दुधाची दुकाने खुली असतील, बँका, विमा व एटीएम खुले असतील आणि मांस, मासे उपलब्ध असतील व पशुखाद्य उपलब्ध होईल, पेट्रोल पंप तसेच एलपीजी गॅसही उपलब्ध असतील. मिळत राहील
  9. लॉकडाऊन दरम्यान काही गोष्टींमध्ये सूट मिळविण्यासाठी खोटे दावे केल्याचे आढळले तर दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. याशिवाय अंत्यसंस्कारा दरम्यान २० पेक्षा जास्त लोकांना जमा होण्याची परवानगी नाही.
  10. सरकारी निर्देशांचे पालन न केल्यास किंवा चुकीची माहिती पसरविल्यामुळे एका वर्षाची शिक्षा होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी