तामिळनाडू: मंदिर उत्सवादरम्यान भीषण अपघात; रथ ओढताना विजेचा धक्का लागून 10 ठार, 15 जण जखमी

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तंजावरमध्ये (Thanjavur) एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका मंदिरात (Temple) मिरवणुकीदरम्यान (Procession)विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

10 killed, 15 injured in electric shock while pulling chariot
रथयात्रेदरम्यान दुर्घटना; विजेच्या धक्याने 10 जणांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • 15 जणांवर तंजोर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
  • मंदिरात 94 वा उच्च गुरुपूजा उत्सव साजरा केला जात होता.
  • पारंपरिक रथयात्रा काढण्यात आली, तेव्हा रथामध्ये विजेचा प्रवाह वाहू लागल्याने भाविकांना विजेचा झटका लागला.

चेन्नई : तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तंजावरमध्ये (Thanjavur) एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका मंदिरात (Temple) मिरवणुकीदरम्यान (Procession)विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. किरकोळ जखमी झालेल्या 15 जणांवर तंजोर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (Medical College Hospital) उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तंजोर जिल्ह्यातील (Tanjore district) असून ती रथ मिरवणुकीदरम्यान घडली आहे. 

तामिळनाडूच्या तंजावर येथे मंदिराच्या रथ मिरवणुकीदरम्यान उच्च दाबाच्या ट्रान्समिशन लाइनच्या संपर्कात आल्यानंतर 10 लोकांना शॉक लागून मृत्यू झाला आहे. मंदिराची रथ मिरवणूक सुरू असताना जवळील कालीमेडू येथे ही घटना घडल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात 94 वा उच्च गुरुपूजा उत्सव साजरा केला जात होता. मंगळवारी रात्रीपासूनच आजूबाजूच्या परिसरातून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान बुधवारी सकाळी शहरातील रस्त्यांवर पारंपरिक रथयात्रा काढण्यात आली. देवाचा रथ ओढण्यासाठी शेकडो भाविकांमध्ये स्पर्धा सुरू होती. नागरिक रथ ओढत ओढत पुढे जात होते. मंदिराचा रथ एका वळणावर आल्यानंतर ओव्हरहेड लाईनच्या संपर्कात आला. यावेळी विद्युत प्रवाह रथात उतरला आणि अनेकांना शॉक लागला.

रथावर उभे असलेले लोक या धडकेत फेकले गेले. त्यानंतर रथाला मोठी आग आगली. जखमी झालेल्यांना तंजावर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत 2 लहान मुलांसह 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 जण यात जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
परिसरातील नागरिकांनी सांगितलं की रथ ओढत असताना परिसरात पाणी साचलं होतं, त्यामुळे 50 हून अधिक लोकांनी रथ ओढणं सोडून दिलं होतं. त्यामुळे जास्त मोठी दुर्घटना टळली. मात्र घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी