CCTV: १५ पुरुष घरात घुसले अन् महिलेला उचललं, अपहरणाचा थरार कॅमेऱ्यात कैद

Woman Kidnap: तामिळनाडूमध्ये एक अशी घटना घडली आहे की, ज्यामुळे तामिळनाडूमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जाणून घ्या नेमकी घटना काय आहे.

tamil nadu mayiladuthurai 15 men barge into house kidnap woman incident caught on camera
१५ पुरुष घरात घुसले अन् महिलेला उचललं, थरार कॅमेऱ्यात कैद 
थोडं पण कामाचं
  • १५ पुरुष चक्क घरात घुसले अन् एका महिलेला पळवलं
  • १५ पुरुषांनी केलं महिलेचं अपहरण, तामिळनाडूत खळबळ
  • अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Kidnapped: मयिलादुथुराई (तामिळनाडू) : तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मयिलादुथुराईमध्ये एक अत्यंत भयंकर घटना उघडकीस आली आहे. इथे कमीत कमी १५ पुरुषांनी (15 Mens) घरात घुसून एका महिलेचं (Lady Kidnap) अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. (tamil nadu mayiladuthurai 15 men barge into house kidnap woman incident caught on camera)

दरम्यान, पोलिसांनी या महिलेची तात्काळ सुटका केली आहे आणि या प्रकरणी तीन तरुणांना अटक केली आहे.

अधिक वाचा: Sex Racket: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 10 ते 25 हजारात पुरवल्या जायच्या परदेशी तरुणी

सीसीटीव्ही फुटेजमध्ये १५ लोक गेटचं टाळं तोडून थेट घरात घुसताना दिसत आहेत. यानंतर काही सेंकदातच काही पुरुषांनी महिलेला घराबाहेर खेचून आणलं. यावेळी या घरातील लहान मुलं आणि इतर सदस्य हे या अपहरणकर्त्या पुरुषांसमोर अक्षरश: हात-पाय जोडत होते.  

दरम्यान, या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांशी तात्काळ संपर्क साधून शोध मोहीम सुरू केली आणि त्याच रात्री महिलेची सुटका केली. अहवालानुसार, तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि महिलेला सुखरुपपणे तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं.

अधिक वाचा: OMG! पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला 10 वर्षांचा तुरुंगवास, मग आली पत्नी जिवंत असल्याची बातमी आणि…

पोलिसांनी सांगितले की, विघ्नेश्‍वरन (वय ३४ वर्ष) या आरोपींपैकी एकाने महिलेशी मैत्री केली होती आणि तो तिचा पाठलाग करत होता. असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. महिलेने मायलादुथुराई पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची तक्रार देखील दिली होती.

तक्रारीनंतर, मयिलादुथुराई पोलिसांनी विघ्नेश्वरनला ताकीद देखील दिली आणि नंतर त्याच्याकडून लेखी निवेदन घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं.

अधिक वाचा: Shocking, गुप्तधनाच्या लालसेपोटी चिमुरडीचे अपहरण,  अमावस्येला करणार होते 'कांड'

दरम्यान, विघ्नेश्‍वरन यांनी याआधी १२ जुलै रोजी महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिने पोलिसांकडे धाव घेतली. याच प्रकरणात पोलीस आरोपी विघ्नेश्वरनचा शोध घेत होती. पण त्याने मंगळवारी रात्री त्याने पुन्हा एकदा आपल्या काही साथीदारांच्या मदतीने महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी