school girl died : आयर्न सप्लीमेंट्सचा ओव्हरडोस घेतल्यामुळे 13 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

Tamil Nadu school girl died after overdosing iron supplements : आयर्न सप्लीमेंट्सचा ओव्हरडोस घेतल्यामुळे 13 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.

school girl died
आयर्न सप्लीमेंट्सचा ओव्हरडोस घेतल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आयर्न सप्लीमेंट्सचा ओव्हरडोस घेतल्यामुळे 13 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
  • धक्कादायक घटनेप्रकरणी शाळेतून 2 जणांचे निलंबन
  • एकदम 45 सप्लीमेंट्स घेतल्यामुळे मृत्यू

Tamil Nadu school girl died after overdosing iron supplements : आयर्न सप्लीमेंट्सचा ओव्हरडोस घेतल्यामुळे 13 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. सरकारी योजनेत विद्यार्थ्यांना आयर्न आणि फॉलिक अॅसिडची सप्लीमेंट्स (iron and folic acid pills or iron and folic acid supplements) दिली जातात. पण ही सप्लीमेंट्स विशिष्ट प्रमाणात घेतली तर आरोग्यासाठी लाभदायी आहे. सप्लीमेंट्सचा ओव्हरडोस तब्येतीला हानीकारक ठरू शकतो. भारतात तामीळनाडूतील ऊटी (Ooty) येथे उधगमंडलम (Udhagamandalam) पालिकेच्या शाळेत 13 वर्षांच्या मुलीने सप्लीमेंट्सचा ओव्हरडोस घेतला. यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.

सरकारी योजनेनुसार पालिकेच्या शाळेला आयर्न आणि फॉलिक अॅसिडची सप्लीमेंट्स मिळाली होती. या सप्लीमेंट्स शाळेत कुठे ठेवल्या आहेत याची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली. यानंतर 6 विद्यार्थी त्या ठिकाणी गेले आणि गुपचूप सप्लीमेंट्स घेऊन आले. यानंतर या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक सप्लीमेंट्स कोण घेणार यावरून पैज लागली. पाच जणांनी प्रत्येकी दहा - दहा सप्लीमेंट्स एकदम घेतल्या. तर फातिमा नावाच्या 13 वर्षांच्या विद्यार्थिनीने एकदम 45 सप्लीमेंट्स घेतल्या. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात आयर्न आणि फॉलिक अॅसिड घेतल्यामुळे परिणाम झाला. ओव्हरडोसमुळे फातिमा तसेच इतर 5 जण बेशुद्ध पडले. शाळेच्या व्यवस्थापनाने बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

ओव्हरडोसमुळे बेशुद्ध पडलेल्यांमध्ये फातिमा, इतर 3 विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थी अशा 6 जणांचा समावेश होता. यापैकी 5 जणांची तब्येत उपचारांमुळे हळू हळू सावरू लागली. फातिमाचे लिव्हर (यकृत किंवा पित्ताशय) डॅमेज झाले. यामुळे फातिमाची तब्येत आणखी खालावण्यास सुरुवात झाली. काही तासांत फातिमाचा मृत्यू झाला. 

सरकारी योजनेनुसार 6 वी ते 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आयर्न आणि फॉलिक अॅसिडची सप्लीमेंट्स दिली जातात. ही सप्लीमेंट्स विशिष्ट प्रमाणात घ्यायची असतात. सप्लीमेंट्स कधी घ्यायची, कशा प्रकारे घ्यायची आणि किती प्रमाणात घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले जाते. पण विद्यार्थ्यांनी सप्लीमेंट्स चोरली आणि स्वतःच्या मर्जीने मोठ्या प्रमाणात घेतली. सप्लीमेंट्सचा ओव्हरडोस विद्यार्थ्यांसाठी घातक ठरला. 5 विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले तर फातिमाचा मृत्यू झाला. 

या प्रकरणात फातिमा ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला (headmaster) तसेच सप्लीमेंट्स सांभाळण्याची जबाबदारी ज्याच्याकडे होती त्या शिक्षकाला (teacher in charge of supplement distribution) निलंबित करण्यात आले आहे. 

शनिकृपेसाठी शनिवारी खा हे पदार्थ

या गावात कुंभकर्णासारखी कुठेही कितीही तास झोपतात माणसं

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी