चार कुत्र्यांवर बलात्कार, आरोपी CCTV मध्ये कैद; पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 29, 2019 | 18:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एका व्यक्तीने रस्त्यावरील कुत्र्यावर बलात्कार केल्याची किळसवाणी घटना समोर आहे. पोलिसांनी विकृत आरोपीला अटक केली आहे.

rape_with_stray_dog_in_chennai.
चार कुत्र्यांवर बलात्कार, आरोपी CCTV मध्ये कैद; पोलिसांनी आवळल्या मुसक्या   |  फोटो सौजन्य: Facebook

चेन्नई: एका ३० वर्षीय विकृत व्यक्तीला कुत्र्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं नाव भास्कर असं असल्याचं समजतं आहे. चार कुत्र्यांच्या पिल्लांसोबत बलात्कार करताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. ही घटना १४ मार्चची आहे. आरोपीविरुद्ध माधवरन मिल्क कॉलनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. आरोपी मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आरोप भास्करविरुद्ध कलम २९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीची सध्या कसून चौकशी सुरु केली आहे. 

प्राणीप्रेमी साई विग्नेश यांनी भास्कर विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी साई विग्नेश यांनी अशी माहिती दिली की, ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. याआधी देखील आरोपीने अनेक वेळा पिल्लांवर बलात्कार केला आहे.  मागील महिन्यात देखील आरोपीने एमएमडीए सेकेंड क्रॉस स्ट्रीट येथे देखील आरोपीने कुत्र्यावर बलात्कार केला होता. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी त्याला पाहिलं देखील होतं. पण त्यानंतर तो तिथून पळून गेला होता. 

 

 

या घटनेच्या एक महिन्यानंतर आरोपीने पुन्हा एकदा कुत्र्यावर बलात्कार केला. यावेळी देखील आरोपी तिथून पळून गेला. पण याबाबत त्यावेळी कुणी तक्रार नोंदवली नव्हती. पण अखेर प्राणीप्रेमी कार्यकता साई यांनी याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी तात्काळ मुसक्या आवळल्या. यानंतर त्याला कोर्टात देखील हजर करण्यात आलं होतं. 

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात दारुच्या नशेत एका व्यक्तीने अशाच प्रकारे कुत्र्यावर बलात्कार केला होता. एक चहाचा स्टॉल चालविणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच शेजारच्या कुत्र्याला आपल्या वासनेचं बळी बनवलं होतं. अशा प्रकारच्या विकृत घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे माणूस आता अतिशय हीन पातळी गाठू लागल्याचंच हे द्योतक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी