Murder Suicide : लग्नास नकार दिल्याने मैत्रिणीचा खून करून आत्महत्या

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 06, 2019 | 16:21 IST | Mirror Now

Murder Suicide : लग्नास नकार दिलेल्या मैत्रिणीचा खून करून एकाने आत्महत्या केली आहे. घटना तमीळनाडूतील आहे. विशेष म्हणजे, तरुणी आणि तिच्या मित्रामध्ये २५ वर्षांचे अंतर होते.

man murdered his girlfriend and commits suicide after rejected his marriage proposal
लग्नास नकार देणाऱ्या मैत्रिणीचा खून करून आत्महत्या  |  फोटो सौजन्य: BCCL

चेन्नई : दीर्घकाळाच्या मैत्रीनंतर लग्नास नकार देणाऱ्या मैत्रिणीचा खून करून एकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तामिळनाडू राज्यात घडला आहे. विशेष म्हणजे खून करणारी व्यक्ती पन्नास वर्षांची, तर संबंधित तरुणी २५ वर्षांची होती. सलेम जंक्शन परिसरात हा प्रकार घडला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सलेममधील इनामुल्लाह आणि शिरीन या दोघांच्या प्रेमकहाणीला काल शुक्रवारी वेगळेच वळण लागले.सलेम रेल्वे जंक्शनच्या बाहेर पंदियराजन यांचे आईस्क्रीम पार्लर आहे. त्या पार्लरमध्ये शिरीन काम करत होती. शुक्रवारी शिरीन चित्राभानू पार्लरमध्ये आल्यानंतर पार्लरचे मालक पंदियराजन कामानिमित्त बाहेर गेले. काही वेळानंतर ते परतले. पण, त्यावेळी पर्लरचे शटर आतून बंद करण्यात आले होते. बराचवेळ प्रयत्न केल्यानंतरही आतून प्रतिसाद मिळाल नाही. त्यामुळे पंदियराजन यांनी सूरमंगलम पोलिस ठाण्यात याची माहिती दिली.

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि शटर तोडून काढले. त्यावेळी आईस्क्रीम पार्लरमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शिरीनचा मृतदेह दिसला. तर, इनामुल्लाहने गळफास लावून घेतल्याचे दिसले, अशी माहिती डेक्कन क्रोनिकलया वृत्तपत्राने दिली आहे. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इनामुल्लाह आणि शिरीन यांचे मैत्रीचे संबंध होते. त्याने शिरीनला अनेकवेळा अडचणींमध्ये मदत केली होती. काही दिवसानंतर इनामुल्लाहने शिरीनकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली. पण, शिरीनने लग्नास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले होते.

शुक्रवारी हा वाद टोकाला गेला. इनामुल्लाह आणि शिरीन यांच्यात खूप वादावादी झाली असावी. त्यानंतर इनामुल्लाहन तिची गळा चिरून हत्या केली आणि स्वतः गळफास लावून घेतला. घटनास्थळी पोलिसांना एक पत्र सापडले असून, त्यात इनामुल्लाहने शिरीनची हत्या आणि आत्महत्येसाठी स्वतःलाच जबाबदार धरले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण

  1. इनामुल्लाह आणि शिरीन यांचे अनेक दिवसांपासून मैत्रीचे संबंध
  2. इनामुल्लाहकडून अडचणीच्या काळात शिरीनला मदत
  3. काही दिवसांपूर्वी इनामुल्लाहकडून शिरीनला लग्नाचा प्रस्ताव
  4. शिरीनकडून लग्नास नकार मिळाल्यानंतर दोघांमध्ये वादावादी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी